कर्जत पाणीपुरवठा योजनेदरम्यान विजेच्या बेकायदेशीर केबलमुळे अपघाताचा धोका; नगरपरिषदेची कारवाई होणार?

Karjat pipe line
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत नगरपरिषद हद्दीत मंजूर नविन पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईन टाकण्याचे काम सध्या कर्जत शहरात सुरू आहे. यापैकी कर्जत कचेरी रोड रस्त्या लगत सुरू असलेल्या पाईप लाईन खोदकामा वेळी कर्जत कचेरी रोड रस्त्यालगत नव्याने झालेल्या गजवक्र इमारत बांधकाम व्यावसायीकांने परवानगी न घेता नियमांचे उल्लघंन करून विजेची केबल टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीतीत वाढते नागरीकरण व जुनी पाणी योजना कुचकामी ठरत असल्याने शासनस्तरावरून ५७ कोटीची नविन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या नविन पाणी पुरवठा योजनेचे काम हे सूरू करण्यात आले आहे. त्यानुसार कर्जत शहरातील अंतर्गत भागातील व मुख्य रस्त्यालगत पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याचे काम सूर आहे. त्यापैकी पिंटो गॅस ते कचेरी रोड मार्ग या दरम्यान पाईप लाईन टाकण्यासाठी रस्त्यालगत खोदकाम काम सूरू असताना, कचेरी रोड मार्गालगत गजव्रक या बांधकाम व्यावसायीकांनी पिंटू गॅस समोरील ट्रांसफार्मर ते गजव्रक इमारतीपर्यंत अंडरग्राउंड टाकलेल्या हाय होल्टेज विजेच्या केबलचा भोंगल कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नियमानुसार सदर अंडरग्राउंड हाय होल्टेज विजेची केबल ही जमिनीच्या ३ फूट टाकणे क्रम प्राप्त असताना ती अंदाजे ६ इंच जमीनीत टाकल्याचा प्रकार उघड झाला आहे. तर ही अंडरग्राउंड हाय होल्टेज विजेची केबल रस्त्यालगत टाकण्यासाठी कर्जत नगरपरिषदेची कोणती परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तर ही हाय होल्टेज असलेली विज केबल ही जमिनी पासुन फक्त ६ इंच टाकली असल्याने मात्र सध्या सुरू असलेल्या नविन पाईप टाकण्यासाठी ब्रेकर व जीसीबीच्या माध्यमातू खोदकाम सुरू असल्याने या हाय होल्टेज वीज केबला ब्रेकर किंवा जीसीबीचा धका लागून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व जर एखादा आपघात होऊन जिवित हानी झाल्यास याला नेमके जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत असल्याने, आशा बेजबाबदार बांधकाम व्यावसायीका विरोधात कर्जत नगरपरिषद कार्यवाही करणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
————————————
मला व्हाट्सअपवर फोटो आणि माहिती पाठवून द्या मी त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करतो.
……तानाजी चव्हाण, प्रशासक तथा मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद
————————————
ही हाय व्होल्टेज वीज केबल रस्त्याचे बाजूने जमीनी खालून टाकण्यासाठीची कर्जत नगरपरिषदेकडून कोणती ही परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही.
……मनिष गायकवाड, नगर अभियंता कर्जत नगर परिषद,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading