कर्जत पाटबंधारे विभागाचा अजब कारभार: शेतकऱ्यांना पाणी नाही, धनिकांसाठी सुविधा मात्र जोमात!

Dam Nauka Vihar
कर्जत ( गणेश पवार ) : 
कर्जत लघुपाटबंधारे विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. धनिकांसाठी लाल पायघड्या हांतरण्यात येत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे. कर्जत तालुक्यातील पाली भुतीवली धरणावर पाटबंधरे विभागाने धनिकांसाठी नौका विहार करण्यासाठी खाजगी कंपनीला परवानगी दिली आहे. यासाठी लाखो रुपयांचे डिपॉझिट तर दुसऱ्या बाजूला याच धरणातील पाणी बिल्डरला विकले जात असताना, ज्या शेतकऱ्यांसाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली त्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप पाणी मिळत नसल्याने शेती ओलिताखाली आण्यासाठी पाटबंधारे विभाग अपयशी ठरली आहे. मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळत नसताना धनदांडग्यांच्या पायाखाली प्रशासनाने लाल पायघड्या हंतरले जात असल्याचे समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा म्हणून ओळखळा जाणारा भाग हा हिरवागार पट्टा व्हावा म्हणून कर्जत – कल्याण राज्यमार्गा जवळील असलेल्या पाली भुतवली गावाचे स्थलांतर करून लघु पाटबंधारे विभाग कर्जत मार्फत पाली भुतवली लघु पाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत धरण बांधण्यात आले आहे. तर या धरणाच्या परिसरातील असलेल्या २० गावातील साधारण ११०० हेक्टर जमिन क्षेत्र हे ओलिताखाली आणण्यासाठी उजवा डावा व मुख्य असे कालवे बांधण्यात येणार होते.
मात्र या करीता कालव्यांचे काम हे लघुपाटबंधारे विभागाकडून पूर्ण झाले नसल्याने व कालव्यांच्या कामाकडे कर्जत लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, मात्र या भागातील शेतकरी हा कालव्या विना आज मितीला दुबार पिकापासुन वंचित राहिला आहे. तर या आधी धरणातील पाणी बिल्डरला विकल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच धरणा शेजारील असलेले काही फार्म हाऊस व रिसॉर्टवाले धरणातून मोठ मोठ्या पंपाव्दारे राज रोश पणे अनाधिकृत रित्या वापरत असल्याचे देखील प्रकार सुरू आहेत. मात्र यांच्या विरोधात लघु पाटबंधारे विभागाकडून कोणती ही ठोस अशी कारवाई होतना दिसत नसल्याचे ही नागरीकांकडून बोलले जात आहे. 
शेतीला पाणी मिळण्यासाठी व कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्त समिती गेली ३० वर्ष लघु पाटबंधारे विभागाविरोधात लढा देत आहे. तर या लढ्यात सहभागी असलेले काही ज्येष्ठ सहकारी आज हे जग सोडून गेले मात्र लघुपाटबंधारे विभागाला या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचे कालवे बांधण्याचे कामाचा विसर पडला असताना, आता पाली भुतवली धरण हे धनदांगड्यांचे चोचले पुरवण्यासाठी व पर्यटन नांवाखाली नौकाविहारा साठी पाच वर्षाच्या कराराखाली भाडेपट्टयावर कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे विभागीय कार्यालयाने दि. १९ डिसेंबर रोजी एका संस्थेला परवानगी देण्यात आली आहे.
या मोबदल्यात संस्थे कडून साडे पंधरा लाखा रूपये अनामत रक्कम आकरण्यात आली आहे. तर वर्षाला दोन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रूपये भाडयापोटी आकरण्यात आले आहे. तर आता तरी २० गावातील साधारण ११०० हेक्टर जमिन क्षेत्र हे ओलिताखाली आणण्यासाठी उजवा डावा व मुख्य असे कालवे बांधण्याची दखल लघुपाटबंधारे विभाग घेणार का? असा प्रश्न देखील उपेक्षित प्रकल्पग्रस्तांकडू उपस्थित केला जात आहे.
——————————————–
सदर नौका विहाराची परवानगी ही आमचे वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
……एस डी शिंदे, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग कर्जत.
——————————————–
पाली भुतवली धरणामध्ये नौका विहारासाठी आम्ही रितसर पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली आहे. तसेच येथे नौका विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक जेटी तीन स्पीड बोट व पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तम क्वालिटीचे लाईफ जॅकेट ची व्यावस्था संस्थेकडून करण्यात आली आहे.
……मुतलिक अब्दुल सय्यद, ठेकेदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading