कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
कर्जत शहरातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विशेष बैठक बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्याप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शहरातील निवडणूक नियोजना संदर्भात पदाधिकारी म्हणून कसे काम केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
त्यामध्ये कर्जत शहराच्या पश्चिम शहरप्रमुखपदी संजय मोहिते, शहर संपर्कप्रमुखपदी सुदेश देवघरे, उप शहरप्रमुखपदी प्रसाद डेरवणकर, दहिवली विभागप्रमुखपदी राकेश शेट्टी, विभाग संघटक पदी कैलास पातेरे, विभाग संपर्कप्रमुखपदी मनोज जाधव, विभाग समन्वयकपदी सचिन चिखलकर, विभाग संघटकपदी अजय दिघे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्याप्रसंगी या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, तालुका संपर्कप्रमुख दिलीप ताम्हाणे, सह समन्वयक पंढरीनाथ पिंपरकर, नगरसेवक ॲड संकेत भासे, शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांसह शहरातील शिवसेना , युवासेना आणि महिला आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.