कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका कारचालकाने नेरळ विद्यामंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांना . गंभीर दुखापत झाली असून, कु. मयूर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर कारचालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेरळ – माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी जवळील धस वाडीतील राहणारे कु. मयूर मोहन पारधी, कु.भगवान सखाराम पारधी व कु. विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असुन, नेहमी प्रमाणे सकाळचे सुमारा शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी साडे सात वाजण्याचे सुमारास नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत – कल्याण राज्यमार्गावरून पायी जात असताना, अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी व नऊ वर्षाचा पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ येथून अबरनाथ येथे त्यांची ईरटीका कार क्र. एम एच ०५ सी वी २८३४ ने जाताना नेरळ पोलीस ठाण्याच्या हेकच्या अंतरावर असलेल्या पटेल मार्ट येथे कु. मयूर मोहन पारधी वय वर्ष १५, १० महिने इयत्ता ११ वी, कु. विशाल आलो दरोडा वय वर्ष १७, ०३ महिने इयत्ता १२ वी, कु. भगवान सखाराम पारधी वय वर्ष १७, ०५ महिने इयत्ता १२वी यांना धडक दील्याने आपघात झाला असुन, सदर आपघातातील शाळकरी मुलांना उपचाराठी प्रथम नेरळ येथील डॉ. शेवाळे यांच्या कडे नेले असता, त्यांना पुढील उपचारा करीता बदलापूर येथील धन्वंतरी रुगणालयात नेण्यात आले आहे.
कु. मयुर महोन पारधी यांला डोंबिवली येथील एम स रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर नेरळ पोलीसांनी ईरटीका कारसह गाडी चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असुन, नेरळ पोलीस ठाण्यात आपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सदर झालेला आपघात व कु. मयुर महोन पारधी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाता मधील जखमी कु. विशाल आलो दरोडा, कु. भगवान सखाराम पारधी, व मयत कु. मयूर मोहन पारधी हे आदिवासी समजातील असुन या घटनेमुळे आदिवासी समजावर मोठया प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासून या अपघातात सामजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे व लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून सोबत गेल्याची व माहिती समोर येत आहे.
————————-
कर्जत कल्याण राज्य मार्ग पुन्हा येकदा या अपघातानंतर चर्चेचा विषय ठरतो. ठिकठिकाणी राज्य मार्गाचे रखडलेले अर्धवट काम आज या अपघाताला कारणीभूत असल्याचे, व या घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील तेवढेच दोषी धरले पाहिजे, ज्या ठीकणी एक पदरी रस्ता आहे. तेथील रस्ता दुहेरी करण्याची मागणी होत असताना, आज पर्यंत अनेकांचे अशा ब्लॅक स्पॉट ठिकाणी अपघात होवून मृत्यू झालेल्या घटनेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्य लक्षात घेता उपाय योजना केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.
…बंडू क्षीरसागर , शिवसेना उ.बा. ठ. नेरळ शहर प्रमुख.
————————-
कर्जत – कल्याण राज्य मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे असे अनेक आपघात होऊन अनेकांचे जीव गेले असुन, तर आरूंद रस्त्यामुळे आज आमच्या आदिवासी समजातील धसवाडीतील तीन शाळकरी मुलांचा कारच्या धडकेत आपघात झाला असुन, या आपघाताला व या अपघातातील दोन अति जखमी व एक मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलांच्या घटनेला संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदार हेच जबाबदार असुन, लवकरात लवकर ज्या ठिकाणी अरूंद मार्ग आहेत. त्या ठिकाणचे रस्ते रूंद करण्याचे काम झाले नाही. तर आदिवासी समाज हा सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल कार्यालयावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल,
…जैतू पारधी, कर्जत तालुका आदिवासी जनजागृती विकास संघटना अध्यक्ष.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.