शासनाच्या जलजीव अंतर्गत योजनेतून ४० लाख रुपये खर्च करू देखील कर्जत तालुक्यातील रजपे ग्रामपंचायत हद्दीतील शिंगढोल येथील उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. शासन दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न करते. तर ज्या ग्रामस्थांची खाजगी टँकरने पाणी मागवण्याची ऐपत आहे. त्यांच्यावर खाजगी टॅंकरने पाणी आणण्याची वेळ आली आहे .
२०२१ साली केंद्र शासनाने हर घर नळ से जल अंतर्गत जल जीवन मिशन हि योजना आणली मात्र हि योजना अनेक ठिकाणी फोल ठरली असल्याचे भयावह चित्र आहे. कर्जत तालुक्यातील रजपे ग्रामपंचायत हद्दीतील ६६ घराची वस्ती असलेल्या शिंगढोल येथे देखील जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम करण्यात आले आहे. तर या योजनेवर शासनाचे एकूण ४० लाख रुपये खर्च करून, या योजनेत साठवण टाकी, विद्युत पंप, उर्ध्व वाहीनी, सँड फिल्टर, उंच सलोह साठवण टाकी २१००० लीटर, एफ एच टी सी कनेक्शन, ट्रायल, वितरण व्यवस्था, या योजनेत उपलब्ध करून दिल्या आहेत.
नदी जवळ बांधण्यात आलेल्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने या विहिरीला पाण्याचा पंप हाऊस बांधून ठेकेदाराने पाईप लाईन गावात सगळीकडे फिरवली असुन, गावात घरोघरी नळ बसवण्यात आले आहे. मात्र ते नळ दिखाव्याच्या कामाचे उरले आहेत. कारण विहरीत असलेल्या पंपातून पाणी टाकीपर्यंत पोहोचतच नाही. विहिरीची मोटर चालू केली की जोडण्यात आलेले पाईप फुटले जातात त्या मधून पाणी सर्व लिकेज होऊन बाहेर जमिनीवर फेकले जाते. जे वॉल बसवण्यात आले आहेत. ते हि सर्व लिकेज आहेत. यामूळे पाणी हे साठवण टाकीत कमी प्रमाणात पोहचले जाते. व गावाला पाणी मिळत नाही.
ही नळ पाणी योजना होऊन दहा महिने झाले. या दहा महिन्यातून महिन्याला दोन ते तीन वेळा पाणी हे ग्रामस्थांना मिळत आहे. मात्र ग्रामस्थांना पुरेपूर पाणी मिळत नसल्याने वयक्तिक टँकरने पाणी आणावे लागत आहे. यासाठी एक हजार ते बाराशे रुपये हे ग्रामस्थांना मोजावे लागत आहे. तर टँकरचे पाणी ही ५ ते १० दिवस पूरत असल्याने, आमच्या गावाला शासनाने जल जीवन मिशन योजना देऊन आमचा फायदा काय? असा प्रश्न देखील येथील महिलान कडून उपस्थित केला जात आहे.
खाजगी फार्म तसेच टँकरचे पाणी आणण्यात येथील ग्रामस्थ महिला यांना दिवसभराचा आपला वेळ घालवा लागत आहे. गावात योजना झाली,पाण्याची टाकी बांधली मात्र ती दिखावा म्हणूनच उरली आहे. ठेकेदाराने पाईपलाइन वरच्यावर टाकली असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे. योजना सुरु झाल्या पासून हि अवस्था असल्याने आम्हाला पाणी भेटणार तरी कधी? असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
————————————–
आज आम्हाला खूप पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत असुन, डोक्यावरती पाणी आणावे लागते, ज्याची ऐपत असेल तर टॅंकर घेऊन आपली पाणी पाण्याची सोय करतोय, आतापासून आम्हाला पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. सरकारनी जल जीवन मिशन योजना आणलेली आहे. त्याच्यासाठी भरपूर पैसे देखील खर्च झालेले आहेत. पण आमच्यापर्यंत ती योजना पुरेपूर सफल झालेली नाही. एका ठिकाणी तर जवळजवळ १० ते १५ मीटर वरती १७ ते १८ ठिकाणी लाईन फुटलेली आहे.
…सोनाली भालिवडे, महिला ग्रामस्थ, शिंगढोल.
————————————–
ज्या ठिकाणी पाईप लाईल फुटलेल्या आहेत. त्या काढून टाकून नविन पाईप लाईन टाकण्याचे तसेच ज्या ठिकाण चे प्रेशर वॉल लिकेज आहे. हे सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना आमच्या स्तरावरून ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर केली जाईल.
…अनिल मेठकरी, उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, विभाग कर्जत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.