कर्जत तालुक्यात सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वादळी वारा पाऊसाने अक्षरशः सर्वसामान्यांना झोडपून काढले आहे. यावेळी कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची एकाच तारांबळ उडाली आहे, तर पाथराज येथे शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले.नेरळ शहरात वीज कोसळल्याने नारळाचे झाड जळाले तर सुरक्षा भिंतीला तडे गेले आहेत.मुसळधार पावसाने वीजपुरवठा खंडित झाल्याने गाव वाड्या अंधारात होत्या.
हवामानात झालेल्या बदलानंतर मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या खांडस,पाथरज, कशेळे,काडव,बोरगाव, धोत्रे,पेठ आंबिवली,कर्जत शहर व नेरळ शहरात अक्षरशः मुसळधार पाऊस कोसळत होता.तर तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असणारे थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे तुरळक प्रमाणात पाऊस पडला.अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली तर वाहन वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागली.मात्र ऐन उन्हाळ्यात कर्जतकरांना उन्हाचे चटके बसत असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काहीसे नागरिक सुखावले होते.वादळी वाऱ्यासह आकाशात चमकणाऱ्या विजांच्या आवाजाने मात्र नागरिक भयभीत झाले होते.
यावेळी नेरळ शहरातील नेरळ पाडा येथील राज बाग येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाडाला आग लागली होती तर येथील चौथ्या मजल्यावरील इमारतीच्या सुरक्षा कठड्याला तडे गेले आहेत.त्यामुळे येथील रहिवाशी नागरिक काही काळ भीतीच्या सावटाखाली होते. नेरळ खांडा येथील गोकुळ धाम या रहिवाशी इमारतीच्या परिसरात देखील विजेचा प्रचंड आवाज झाला. तालुक्यातील पाथरज गावात राहणारे शेतकरी परशुराम गांधीवले यांच्या घराचे सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे छप्पर उडून घराचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर भिजत राहण्याची वेळ आलेली आहे.तालुक्यात या अवकाळी पावसाने,अंबा बागायतदार फळ पिकांचे तर वीट भट्टी धारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे लग्न सराईची धामधूम सुरू असताना नवरा नवरीच्या लग्न मंडपात आलेल्या व्हराडी नागरिकांची पडलेल्या पावसाने एकाच तारांबळ उडाली असून लग्न मंडपे भिजले तर पाणी ठीपकत होते.मंगळवारी रात्री सुरू झालेल्या या पावसाने उशिरा शांत झाला मात्र आज बुधवार दुसऱ्या दिवशीही या अवकाळी पावसाने जोरदार आपली बॅटिंग सुरू केली होती.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.