कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मोग्रज येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामावर काम करणाऱ्या स्थानिक आदिवासी तरूणास मोग्रज ग्रामपंचयात माजी सरपंच व त्यांच्या मुलांकडून जातीवाचक शिवीगाळ व जबरी मारहाण तसेच सदर आदिवासी तरूणांचे वडिल व भाऊ हे मारहाणी बाबत विचारण्यासाठी गेले असता, त्यांना ही माजी सरपंच व त्यांच्या मुलांकडून मारहाण झाल्याची घटना घडली असुन, या संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात मारहाणी तसेच जातीवाचक शिवीगाळ संदर्भात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ऐन विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी व त्यामध्येच लागलेली आदर्श आचारसंहितामध्ये कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत माजी सरपंच व त्याचे मुलांविरोधात मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ संदर्भात ॲट्रॉसिटीचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणूकीची रणधुमाळी असताना, सरपंच व त्याच्या मुलांकडून झालेली मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने, कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे वातावरण तापून कायदा सुव्यवस्था बिघडणार का? असा प्रश्न मात्र सामान्य जन माणसांमधून केला जात आहे.
मोग्रज ग्रामपंचायत हद्दी मध्ये पाण्याची टंचाई परिस्थिती असल्याने, या ग्रामपंचायत क्षेत्रात शासनाची जल जीवन मिशन ही योजना अतिशय जलद गतीने मंजूर करत कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. याच हद्दी मध्ये असणारे मालेगाव या गावात देखील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे. सदर कामाचा ठेका हा निरा इंटरप्राईस” या कंपनी कडे असून, ठेकेदार म्हणून जाधव कार्यरत आहेत. ठेकेदार जाधव यांनी या पाणी टाकी वार काम करणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी मोग्ररज ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी या गावातील राजेंद्र पुंडलिक उघडे या आदिवासी तरुणाची नेमणूक केली आहे.
शनिवार दि. ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी राजेंद्र उघडे हा नियमित पणे त्या ठिकाणी टाकी बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेला असता. तेथे पाण्याच्या मोटारी मध्ये बिघाड झाल्याचे समजल्याने तो जवळील विद्युत पुरवठा वाहिनी येथे असणाऱ्या बोर्ड जवळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेला असता. तेथे सरपंच रमेश उर्फ पुंडलिक सदाशिव देशमुख यांनी त्याला जातीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. की “तुम्ही आदिवासी या ठिकाणी तुमची काम करायची लायकी नाही. तसेच इकडे कामाला अलात तर तुम्हाला मारून टाकू” अशा प्रकारे बोलले असता, राजेंद्र उघडे हा तिथून निघून येत असताना, त्याला माजी सरपंच रमेश उर्फ पुंडलिक सदाशिव देशमुख ,त्याचे दोन्ही मुले संदेश पुंडलिक देशमुख व विक्रांत पुंडलिक देशमुख यांनी लोखंडी पाईपणे व लाकडी दांडकाने मारहाण केली.
या मारहाणी मद्ये राजेंद्र पुंडलिक उघडे यांच्या डोक्यात व पायाला मोठ्या प्रमाणात इजा आहे. तसेच राजेंद्र पुंडलिक उघडे यांनी त्यांच्या वडिलांना फोन करून सांगितलं की मला मारहाण झाली आहे. अशातच त्यांचे वडील पुंडलिक उघडे व त्यांचा मोठा मुलगा नितीन पुंडलिक उघडे हे घटनास्थळी पोहोचले तर राजेंद्र पुंडलिक उघडे हा रक्ताने माखलेला जमिनीवर पडला होता. तसेच झाला प्रकार पुंडलिक उघडे हे विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील संदेश पुंडलिक देशमुख व विक्रांत पुंडलिक देशमुख यांनी लोखंडी पाईप ने पाठीवर तसेच नितीन पुंडलिक उघडे यांच्या देखील डोक्यावर लोखंडी पाईप ने मारले.
वरील तिन्ही लोकांना जबर मारहाण झाली असल्याने, या संदर्भात कशेळे आऊट पोस्ट असलेल्या पोलीस ठाण्यात मारहाण झालेल्या व्यक्ती सरपंच व त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता, त्यांना कर्जत पोलीस ठाण्यात पाठविण्यात आल्या प्रमाणे सदर मारहाण व जातीवाच शिवीगाळ प्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्या प्रमाणे कर्जत पोलीस ठाण्यात सरपंच रमेश उर्फ पुंडलिक सदाशिव देशमुख व दोन मुले संदेश पुंडलिक देशमुख व विक्रांत पुंडलिक देशमुख यांच्या विरोधात गु.र.न. २७५/२०२४, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५), अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९, ३(१)(r)(s), ३(२) (V) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्यातील पुढील तपास हा कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे हे करीत आहे.
————————————————–
आनंदवाडी येथील आदिवासी बांधवांना मारहाण झाली ती घटना निंदणीय आहे. आजही कर्जत तालुक्या मध्ये आम्हच्या आदिवासी बांधवावर अन्याय चालू आहे तो अन्याय थांबावा व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीस तातडीने अटक करून आदिवासी बांधवास न्याय मिळावा हि पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा…
…परशुराम दरवडा
अध्यक्ष आदिवासी समाज संघटना कर्जत
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.