रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी येथील अब्बास नामक इसमाच्या फॉर्म हाऊस येथे सुरू असलेल्या बनावट सिगारेटच्या कारखान्यावर रायगड पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत पाच कोटींच्या आसपास मुद्देमाल जप्त करीत पंधरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगवी परिसरात मुंबई येथील अब्बास नामक इसमाचा फॉर्म हाऊस आहे. या फॉर्म हाऊस मध्ये गोल्ड फ्लॅग नामक बनावट सिगरेट बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळताच त्यांनी त्वरित सदरची माहीती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे रायगड यांना दिली.
रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एक पथक तयार करीत त्यांनी कर्जत तालुक्यातील सांगवी गावच्या नदीच्या कडेला असणा-या अलिशान फार्म हाउसला भक्कम तटबंदी व उंच असलेले संरक्षित भिंत आढळून आले. सदर संरक्षित भिंतीला मोठे दरवाजे होते ते आतून बंद असल्याचे आढळून आले.
सदर दरवाजे उघडण्यासाठी आवाज देण्यात आला परंतु आतुन प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून पथकापैकी काही कर्मचारी यांनी पाठीमागील नदीच्या बाजूला असलेल्या संरक्षित भिंतीवरून फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश केला, पोलीसांना पाहुन आतील एक कामगाराने त्यानंतर दरवाजा उघडला, त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक सरगर सहा पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहा फौ राजेश पाटील, पोलिस हवालदार झेमसे, मोरे, सावंत,म्हात्रे, मुंढे यांनी आतमध्ये जावुन पाहणी केली असता, एक मोठया गाळयामध्ये गोल्ड प्लॅग कंपनीच्या नावाचे सिगारेट निर्मिती करीत असलेले मोठ-मोठ्या मशिनवर १५ कामगार आढळून आले. सदर वेळी कारखान्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर सिगारेट निर्मिती करण्याकरीता लागणारी प्रोसेस केलेली मिश्रीत सुंगधीत तंबाखु मोठ्या प्रमाणावर आढळून आली.
सिगारेट बनविण्याकरीता लागणारा कागद, पॅकींग करण्याकरीता लागणारे बॉक्स, सिगारेट पॅक करण्याकरीता लागणारे पॅकेट व इतर सर्व संबंधित साहीत्य व सिगारेट तयार करणा-या मोठमोठ्या सेमी अॅटोमॅटिक ३ मशीन त्यावर सिगारेटची निर्मिती केली जात होती. सदर निर्माण केलेली सिगारेट पॅकेटमध्ये पॅक करून पॅकेटचा बॉक्स व सदर बॉक्सचे मोठे कॅरेट पॅक केलेले मोठ्या प्रमाणावर आढळुन आले. सदरवेळी कामगाराकडे सिगारेट निर्मितीबाबत आवश्यक पायाने त्यात विचारणा केली परंतु त्यांच्याकडे कोणतेही परवाने तथा माहीती प्राप्त झाली नाही त्यामुळे गोल्ड पतंग कंपनीच्या नावाने सिगारेट बनविणारा बनावट कारखाना असल्याचे निष्पन्न झाले.
सदरगी माहीती मा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे रायगड यांना देण्यात आली, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली व कारवाईबाबत सूचना दिल्या त्यानंतर पंचाना पाचारण करून तयार केलेल्या सिगारेटचा माल, सिगारेटला बनविण्याकरीता लागणारे मटेरियल, लागणारे साहीत्ये याचे मोजमाप करण्यात आले त्यावेळी २,३१,६०,०००/- रू किंमतीच्या तयार केलेल्या सिगारेट, १५,८१,९००/- रू किंमतीचे सिगारेट करण्याकरीता लागणारे मटेरियल,२,४७,०००००/- रू किंमतीचे सिगारेट तयार करण्याकरीता लागणा-या मशिनेरी असा एकूण ४,९४,४६,९६०/- रू किंमतीचा मुद्देमाल पंचनामान्वये जागीच जप्त करण्यात आला.
याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात बनावट कारखाना चालवणारे कुमार विश्वकर्मा (मध्यप्रदेश),कम्मारी राजेश्वर(तेलंगाणा),लेक राम सोनी (छत्तीसगड),महमद बशीर (तेलंगाणा,)नारायण सर्यनारायण (तेलंगणा),सिध्दार्थ कोल्हटकर(महाराष्ट्र),मनोहर खांडेकर (महाराष्ट्र), दुर्गाप्रसाद अनुसुरी (आंध्रप्रदेश),रवी पिथानी(आंध्रप्रदेश),युसुब शेख (महाराष्ट), कैलास कोल्हटकर(महाराष्ट), मनीकंटा लावीटी (आंध्रप्रदेश),हरिप्रसाद चाकली (तेलंगाणा),सोहेल सिंग (उत्तरप्रदेश),हरिश मोर्या (उत्तरप्रदेश) या पंधरा आरोपीविरोधात विरूध्द कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.२६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम १२३.३१८(२) ३९८(४).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात सदर १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीतांकडे चौकशी केली असता त्यांचेकडे सिगारेट बनविण्याकरीता लागणारे गोल्ड प्लॅग कंपनीचे संमती अथवा करारपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर कारखाना चालविण्याकरीता विद्युत महावितरण कंपनी यांना संशय येवु नये म्हणुन वीज न वापरता जनरेटर वापरत असल्याचे आढळून आले. सदर अटक केलेले सर्व आरोपी हे आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड व इतर बाहेर राज्यातील असल्याने आढुळन आले आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा करीत आहेत. सदर तपासादरम्यान सदर कारखान्याचा मालक, जागेचा मालक, सिगारेट बनविण्याकरीता लागणारे मटेरियल कुठून आले, तयार केलेली सिगारेट कुठे-कुठे वितरीत करण्यात आली याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.