कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना आमसभेचा विसर

Karjat Panchayat Samitee
कर्जत (गणेश पवार) :
आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती तसेच प्रत्येक होणाऱ्या विकास कामात पारदर्शकता हि निर्माण होते. तसेच जनतेला थेट अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी थेट संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या त्यांच्या समोर मांडता येतात.
तालुक्यांतील प्रलंबित प्रश्नांवर स्थानिक आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधींच्या समोर चर्चा होऊन त्याची सोडवणूक व्हावी. या हेतूने वर्षाला आमसभा घ्यावी, असे संकेत आहेत. महाराष्ट्र राज्यात १९६२ त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्था अस्तित्वात आली. त्यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती व्हावी, तालुक्यातील जटील प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी १९६७ ला आमसभा घेण्याचा निर्णय झाला आहे.
पण हे करत असताना त्याला संविधानिक अधिकार दिला गेला नाही. त्या सभेला स्वत: जिल्हा परिषदेच्या व पंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्या दिवशीच्या कामाचे प्रोसिडिंग झाले पाहिजे. त्यानुसार वर्षभरात त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. गेल्या ५० वर्षांत सुरुवातीला कालावधी सोडला, तर अलीकडे आमसभांचा विसरच हा प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींना ही पडला असल्याचे वास्तव समोर येत आहे. वास्तविक या आमसभांमधून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागत असल्याने, या आमसभा तालुक्याच्या केंद्रस्थानी मानल्या गेल्या पाहिजेत.
कर्जत तालुक्याचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यकाळात मात्र वार्षिक आर्थिक आमसभा पार पडल्याचे दिसत होते. सन. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांचा पराभव करत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे निवडूण आले होते. मात्र भारतामध्ये कोविड – १९ या आजाराच्या संसगाचा सन. २०२० मध्ये संपूर्ण भारतदेशात प्रसार झाल्याने संपूर्ण देशात सन.२०२२ पर्यंत लॉकडाऊन असल्याने, लोकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने व शासनाची तशी बंदी असल्याने, संपूर्ण देशात व राज्यात अशा आमसभा झाल्या नाही.
मात्र कर्जत तालुक्यात सन. २०२३ – २४ व सन. २०२४ – २५ ची आमसभा झाली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. तर कर्जत तालुक्याची ओळख ही अति दुर्गम आदिवासी बहुल भूमाग अशी आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासी वाडया वस्त्या तसेच ग्रामिण भागातील समस्यांचे प्रश्न, तसेच सुरू असलेल्या विकास कामांपैकी रावलेल्या कामांविषयीचे प्रश्न लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या येथील पुढे मांडण्याच्या ग्रामस्थ व नागरिकांच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम होत आहे. का? असा देखील प्रश्न तालुक्यातील नागरिक व काही राजकिय पुढाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना आमसभेचा विसर पडला आहे का? तसेच कर्जत तालुक्यात आमसभा होणार का? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत.
———————————–
आता मार्च महिना हा आर्थिक हिशोबाचा असल्याने या महिन्यात आमसभा घेता येणार नाही. तरी साधारण एप्रिल महिन्यात आमसभा घेता येईल, तसे मी आमदार साहेब यांच्याशी बोलून त्यांची वेळ घेऊन आमसभेची वेळ व तारीख निश्चित करतो.
……सुशांत पाटील, गट विकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading