कर्जत तालुका प्रेस क्लबच्या शिरस्ते प्रमाणे कर्जत प्रेस क्लबच्या कार्यकारणी सह सदस्य यांची कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दि.२२ जानेवारी रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत कर्जत प्रेस क्लबच्या तालुका अध्यक्षपदी गणेश पवार तर नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीच्या सुरवातीला माथेरान प्रेस क्लबचे सदस्य तथा दैनिक सकाळ वृत्तपत्राचे माथेरान प्रतिनिधी अजय कदम यांचे बंधू विजय कदम यांचे हृदयविकाराच्या झटक्याचे आजारांनी निधन झाले असल्याने, कर्जत प्रेस क्लबच्या वत्तीने प्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या अध्यक्ष पदाच्या चार वर्षाचे कार्यकाळात कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून त्यांनी संघटना एकजूट ठेवत प्रेस क्लबचे नियोजित कार्यक्रम हे नियोजनबद्ध पणे उत्तम प्रकारे पार पाडत संघटना वाढीचे चांगळे कर्तव्य पार पाडल्याबद्दल संघटनेच्या कर्यकारणी सह सर्व सदस्यांकडून कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांचा आभाराचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर कर्जत प्रेस क्लब च्या शिरस्ते प्रमाणे नविन अध्यक्ष व कार्यकारणी निवडीच्या विषयानुसार कर्जत प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष गणेश पवार यांची एक मताने कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
नविन कार्यकारणी प्रमाणे कार्याध्यक्ष पदी विलास श्रीखंडे,उपाध्यक्ष पदी अनिल गवळे,कांता हबळे,सचिव पदी अजय गायकवाड,सहसचिव मोतिराम पादीर, खजिनदार मल्हार पवार, सहखजिनदार ज्ञानेश्र्वर बागडे,प्रसिद्धी प्रमुख पदी आनंद सकपाळ यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस रायगड प्रेस क्लबचे खजिनदार दर्वेश पालकर,कर्जत प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष राहुल देशमुख,विद्यानंद ओव्हाळ, दिपक पाटील,कांता हाबळे,जयवंत हाबळे, मल्हार पवार,विलास श्रीखंडे,गणेश मते,गणेश पवार, अजय गायकवाड,विकास मिरागिणे, विपुल माळी,गणेश पुरवंदन,निखिल घाग, आनंद सकपाळ आदी सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.