कर्जत-खालापूरातील पत्रकारांचा सुधाकर घारे यांच्याकडून यथोचित सन्मान

कर्जत-खालापूरातील पत्रकारांचा सुधाकर घारे यांच्याकडून यथोचित सन्मान
कर्जत (गणेश पवार) : 
शासकीय सेवा, शासन कार्यप्रणाली अथवा नागरिसमस्या आदी विविध प्रश्नावर आवाज उठवणे व सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य तो न्याय देण्याचे काम हे पत्रकार अखंडितपणे करत असतात. तर जनता व लोकशाहीमधील मुख्य दुवा म्हणून पत्रकारांकडे पाहिले जात असल्याने, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत कर्जत – खालापूर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा नियोजित करण्यात आला होता. सदर सन्मान सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सुधाकर घारे यांच्या जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी जि.प.सभापती अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, विजय मांडे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, राकेश खराडे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम देशमुख यांच्यासह आदी मान्यवर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले तसे पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्याही प्रतिमेचे पूजन हे सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी एखादी बातमी करण्यासाठी शहानिशा केल्याशिवाय बातमी करू नये, जर एखादी बातमी ही एखादयाच्या आयुष्यासंदर्भात निगडीत असेल तर यामुळे एखाद्याचे आयुष्य उद्घवस्थ होवू शकते याची खबरदारी घेवूनच बातमी केली पाहिजे असे मत खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी व्यक्त करीत सुधाकर घारे यांनी पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल अभार व्यक्त केले.पत्रकारांचा सन्मान अनेकजण करतात परंतु सुधाकर घारे यांच्यावतीने सर्व पत्रकरांना प्रत्यक्ष फोन करून निमंत्रित करून सन्मान केल्याने महिला पत्रकार सारिका सावंत यांनी घारे यांचे कौतुक करीत पत्रकारीता करताना महिला म्हणून येणाऱ्या आडचणी सांगत मदत करणाऱ्या सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त केले.  यावेळी जेष्ठ पत्रकार विजय मांडे, भाई ओव्हाळ, प्रविण जाधव यांनी अनुभव सांगत पत्रकारांना कानमंत्र दिले.
विधानसभेची अपक्ष निवडणुक लढवत असताना सर्व पत्रकारांनी पाठीशी उभे राहून शक्ति दिली त्याबद्दल सुधाकर घारे यांनी पत्रकारांचे प्रथम आभार मानत माझ्या विरोधात केलेली बातमी ही मी आनंदाने स्विकारली असल्याची कबुली देत मान्य केली. मी कोणत्याही पत्रकाराला धमकावलं नाही. परंतु कोणी धमवकावत बातमी डिलीट करायला सांगत असतील तरी धमकीला न घाबरता पत्रकारांनी बातमी केली पाहिजे असे ही घारे यांनी पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त करत, पत्रकारानकडून ज्या आडचणी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून पत्रकारांना जी मदत लागेल ती केली जाईल, जेव्हा जेव्हा गरज लागेल आम्ही सदैव पत्रकारांच्या कायम पाठिशी ऊभे राहणार असल्याचा शब्द यावेळी सुधाकर घारे यांनी उपस्थित पत्रकारांना दिला आहे. तर या पत्रकार सन्मान सोहळ्यास कर्जत – खालापूर तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती लाभली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading