कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहिर केले असल्याने, राज्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
परंतू कर्जत तालुक्यातील कशेळे, पाथराज गावात राजकीय पक्षांच्या कार्यालयावरील पक्षाचे चिन्हाचे फलक राजरोसपणे लागल्याचे चित्र समोर येत असल्याने मात्र कशेळे गावात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहिता लागू नाही का? की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहितेचा शासन प्रशासनास विसर पडला आहे का? असा प्रश्न मात्र सामान्य जन माणसांमधून उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतचं संपूर्ण जाहिर केलेले वेळापत्रक झालेली विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा व त्यानुसार निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहितानुसार आयोगाकडून घालण्यात आलेल्या नियम त्यानुसार राजकीय पक्षांचे कार्यालयावरील तसेच गाव परिसरातील भागांमध्ये राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले लावण्यात आलेले फलक हे काढणे किवा झाकणे अनिवार्य असताना, कर्जत तालुक्यातील कर्जत – मुरबाड राज्य मार्गावर वसलेल्या कशेळे गावात मात्र राजकीय पक्षांचे असलेल्या कार्यालयांवर पक्षाचे नांव व चिन्ह असलेले फलक राजरोश पणे झलकताना दिसत असल्याने, कशेळे गावात निवडणूक आयोगाची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहिता लागू नाही का? की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आर्दश आचारसंहितेचा शासन प्रशासनास विसर पडला आहे का? की शासन प्रशासन या राजकीय पक्षांपुढे गोंडा घोळतात का?असा प्रश्न मात्र सामान्य जन माणसांमधून उपस्थित केला जात आहे.