कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवाद मेळवा व पक्ष प्रवेश सोहळा; घारे यांचं पुनर्वसन होणार का ?

कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवाद मेळवा व पक्ष प्रवेश सोहळा; तटकरे यांच्या विधानानुसार सुधाकर घारे यांचे पुनर्वसन होणार का ?
कर्जत ग्रामीण (मोतीराम पादीर) : 
२०२४ च्या विधानसभा निवडणूकी नंतर लोटलेल्या सहा महिन्यांच्या कालावधी नंतर पुन्हा एकदा कर्जत – खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  सुधाकर  घारे यांच्या नेतृत्वाखाली एकवटला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवल  बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी कर्जत येथील सायंकाळी ५.०० वाजता रॉयल गार्डनमध्ये  भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी  राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवल व इगतपूरीचे आमदार हिरामण कोसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा राजिप चे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, कर्जत पंचायत समीती माजी उप सभापती  जयवंती हिंदोला कृषी बाजार समीतीचे संचालक रविंद्र झांजे, मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष सचिन कर्णूक, शिवसेना उबाठा गटाचे अरूण मालुसरे यांच्यासह आदी राजकीय पक्षातील माजी सरपंच, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जत तालुक्यातील कशेळे भागात आदिवासी संकुलन मिळण्याच्या मागणीला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे व राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवल यांनी हिरवा सिंगनल देत पुढच्या ९ एप्रिल २०२६ पर्यंत आदिवासी  संकुलनाचे काम पूर्ण करण्यात येईल असे देखील आश्वासित करण्यात आले आहे.
कर्जत मधील नव्याने होत असलेल्या  कर्जत पनवेल उपनगरीय रेल्वे कॉरिडोर याला  वीर हुत्तामा हिरोजी पाटील यांचे नांवा देण्याच्या मागणीचा मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करून वीर हुत्तामा हिराजी पाटील यांचे नांवाला मान्यता कशी मिळवायची यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading