कर्जतमध्ये अभूतपूर्व अलोट गर्दीचा उच्चांक मोडला; महायुतीचा झंझावात

कर्जतमध्ये अभूतपूर्व अलोट गर्दीचा उच्चांक मोडला; महायुतीचा झंझावात
माथेरान ( मुकुंद रांजणे ) : 
कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार महेंद्र थोरवें चा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जवळपास चाळीस हजार पेक्षाही अधिक चाहत्यांच्या उपस्थिती मध्ये थोरवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भर रखरखत्या उन्हात सुध्दा कशाचीही तमा न बाळगता कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या रॅलीत हजेरी लावली होती.
युवा वर्गासह आबालवृद्ध आपल्या लाडक्या विकासपुरुष महेंद्र थोरवें च्या दुसऱ्या पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी सकाळपासून कर्जत मधील बाळासाहेब भवन येथे जमले होते. जिकडे तिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेऊन शिवसैनिक जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सामील झाले होते. खऱ्या अर्थाने महेंद्र थोरवे यांनी आपल्या कार्यकाळात जी काही शाश्वत विकासकामे केली आहेत त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सर्व जनसागर पुन्हा एकदा थोरवे यांना निवडून देण्यासाठी सज्ज झालेला दिसत होता.
कर्जत खालापूर मतदार संघातील खेडोपाड्यातील, तळागाळातील मतदार यावेळी उपस्थित होता. माथेरान सारख्या दुर्गम भागातील शिवसैनिक सुध्दा शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, शिवसेनेचे संघटक मनोज खेडकर, उप शहरप्रमुख प्रमोद नायक,शिवाजी शिंदे, योगेश जाधव त्याचप्रमाणे युवा सेनेचे अध्यक्ष गौरंग वाघेला यांच्या साथीने माथेरानचे शिवसैनिक,युवती सेनेच्या पदाधिकारी महिला आघाडीच्या समस्त कार्यकर्त्या, महायुती मधील घटक पक्ष्याचे कार्यकर्ते,तसेच नुकताच पक्षप्रवेश केलेले शिवसेनेचे नवोदित कार्यकर्ते आणि या विधानसभेच्या निवडणुकीत खासकरून महेंद्र थोरवे यांना बाहेरून पाठींबा देणारी मंडळी सुध्दा यावेळी स्वताहून कर्जत मध्ये दाखल झाली होती. न भूतो न भविष्यती असा हा नेत्रदीपक जनसागर कर्जत मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे महेंद्र थोरवे यांचा विजय निश्चितच होणार आहे असे सूर कर्जत परिसरातून ऐकावयास मिळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading