कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत भागातील भागूचीवाडी येथे १५ डिंसेबर रोजी भरवण्यात आलेल्या आदिवासी कबड्डी सामन्यात एकूण ६४ आदिवासी संघानी सहभाग नोंदवला होता. यात सुधागड,पाली,पेण,कर्जत, आलिबाग,खालापूर, मुरबाड तालुक्यातील संघाने सहभाग घेतला होता.त्यामध्ये कवेलावाडी सुधागड तालुक्यातील संघाने प्रथम क्रमांक पटकावून भागूचीवाडी चषकावर आपले नाव कोरले.
१५ डिसेंबर रोजी जय हनुमान कबड्डी भागूचीवाडी यांनी आदिवासी कबड्डी आसोसिएशन यांच्या मान्यतेने आदिवासी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनात ६४ संघाने नाव नोंदणी केली होती.या मध्ये ६४ संघातून ८ संघ विजय ठरले आहेत.त्यात प्रथम क्रमांक कवेलावाडी, द्वितिय क्रमांक करमेली खालापूर, तृतीय क्रमांक नारळवाडी,चौथा क्रमांक बोरीचीवाडी कळंब,पाचवा क्रमांक डिंकसलं पाली,सहवा क्रमांक कडाप्पा,सातवा क्रमांक शाळेचीवाडी, आठवा क्रमांक गौरकामत.हे संघ बक्षिस पात्र ठरले होते.
यामध्ये अंतिम सामना कवेलावाडी सुधागड विरुद्ध करमेळी खालापूर यामध्ये झाली शेवटच्या मिनटांत कवेलावाडी संघ लिड देत करमेळी खालापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी आयोजक जय हनुमान कबड्डी संघ भागुचीवाडी तसेच भागूचीवाडी ग्रामस्थ यांनी खुप सुंदर आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना कर्जत अध्यक्ष पशुराम दरवडा,माजी पंचायत समिती उपसभापती जयवंती हिंदोळा,सचिव भगवान भगत,काशिनाथ पादीर.कळंब ग्रामपंचायत माजी सदस्या निलम ढोले,चाहू सराई,दत्तात्रय हिदोळा,शिवराम बदे,जानू पादीर, हरिचंद्र पादीर,वसंत ढोले,दादा पादीर,जयवंत पारधी,नंदू धुळे,आंबो पारधी,किरण कडाळी,गोमा दरवडा,बबन शेंडे,
हे सामने सुथीतीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी आपार मेहनत घेतली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.