रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर हद्दीतून रोज हजारो टन मायनींग ( मिश्रीत माती)ट्रक ट्रेला,आयवा डंपरने श्रीवर्धन, म्हसळा राज्य मार्गाने आणि दिघी पुणे राष्ट्रिय मार्गाने वाहतूक करण्यात येत आहे. दिनांक २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ओव्हरलोड मायनिंग वाहतूक करणारा हायवा डंपर क्रमांक एम एच ४३- बी पी ७८४३ श्रीवर्धन कडून म्हसळा मार्गे सकलप गावाचे हद्दीतील दिघी पुणे राष्ट्रिय मार्गाचे सकलप फाटा येथे तीव्र उतार उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर समोरील डोंगराला धडकुन अपघात झाला.
अपघातात डंपरचा पुढील भाग पुर्णपणे चेपला गेल्याने डंपर चालक नसिमुद्दिन जमरुद्दिन अनसारी वय वर्षे ३५ रा.नवदानगर,बिलूनगड,हजारीबाग झारखंड हा गाडीतच अडकुन जागीच ठार झाला. मायनींग वाहतूक करणारा हायवा डंपर हा श्रीवर्धन येथील रमेश मोहिते यांचे मालकीचा असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच म्हसळा पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे,उप पोलिस निरीक्षक रोहिनकर,पोलिस कॉन्स्टेबल पालोदे आदी पोलिस कर्मचारी आणि शेकडो स्वयंसेवी नागरीक यांनी घटनास्थळी जावून मदतकार्य केले.अपघाताची तीव्रता पहाता अपघात झालेल्या गाडीत अडकुन पडलेल्या डंपर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीचे साहाय्याने तब्बल एक तास प्रयत्न करावे लागले. या कामी पोलिसांना म्हसळा स्वयंसेवी नागरिकांनी खुप मेहनत व मदत केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.