“ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा जल्लोष कोलाड आंबेवाडी नाक्यावर!”

Kolad jallosh
कोलाड (श्याम लोखंडे) :
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बुधवारी ७ में रोजी पहाटे आपल्या भारतीय सैनेदलानी पाकिस्तानात जाऊन हवाई हल्ला करत पाकिस्तानातील दहशतवाद्याचे ९ अड्डे उध्वस्त केले. या निमित्ताने रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाका येथे बुधवारी सायंकाळी ठीक ७:०० वाजता.सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी तर्फे पाकिस्तान वर जो सिंधूर ऑपरेशन करण्यात आला आहे. त्याचा आंबेवाडी नाका द. ग. तटकरे चौकात विजय साजरा करण्यात आला. यावेळी फटाके वाजवून त्याची आतषबाजी तसेच गोड वाटून आनंद तसेच जल्लोष करण्यात आला. पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला चोख उत्तर दिले तर पाकिस्तानचा अधिक निषेध करण्यात आला.
जम्मू काश्मीर पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानला दिलेले चोख उत्तर म्हणून देशाच्या सैन्य दलाचा अभिमान म्हणून तसेच पाकिस्तानचे नक्षल दहशतवाद्याचे ९ अड्डे उध्वस्त केले या प्रीत्यर्थ हा आनंदोत्सव आणि जल्लोष कोलाड सकल हिंदू समाज आणि कोलाड आंबेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकमेकांना पेढे वाटून करण्यात आला.
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यात अनेक पर्यटक मृत्युमुखी पडले होते हिंदू महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले होते. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तान विरोधात संपाताची एकच लाट उसळली होती. त्याला भारत सरकार या हल्ल्याला प्रत्युतर देण्यासाठी गेले काही दिवस तयारी करत असतांनाच मंगळवारी मध्यरात्री तसेच बुधवारी पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील ९ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला प्रत्युत्तर देत त्यांचे अड्डे उध्वस्त केले त्याचा आनंद व्यक्त करत शेवटी एकमेकांना पेढे भरवले.
यावेळी महेशस्वामी जंगम ,अनंत जोशी, विजय शिंदे, चंद्रकांत लोखंडे,संजय कुर्ले, प्रमोद लोखंडे,भाऊ गांधी, भरत सातांबेकर, महेंद्र वाचकवडे, येरूनकर, विराज शिंदे, कुमार लोखंडे, चेतन शर्मा, गणेश वाचकवडे, अजय लोटणकर, उदय राजपुरकर,व्यापारी संघटना, रिक्षा व टेम्पो संघटना तसेच कोलाड सकल हिंदू समाज, पंचक्रोशीतील इत्यादी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading