ऑनलाइन जुगाराच्या नादात युवकानं केली घरफोडी; पेण पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

Pen Police 1

PEN न्यूज ऑनलाइन टीम 
ऑनलाइन रमी जुगाराच्या गर्तेत अडकलेल्या एका 27 वर्षीय तरुणाने पेण परिसरात घरफोडी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून चोरलेलला मुद्दे माल हस्तगत करण्यात आला आहे.   
प्राप्त माहिती नुसार, पेण तालुक्यातील काश्मिरे गावात वारंवार घरफोडी आणि चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संगिता पाटील व त्यांचे पती (रा. काश्मीरे, पो.कांदळेपाडा, ता. पेण, जि. रायगड)  घराला लॉक लाऊन कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन या घरात अज्ञात चोरट्याने बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून ३.७४ लाख रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम लंपास केली. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासात आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू म्हात्रे (वय २७, रा. काश्मिरे, पो. कांदळेपाडा, ता. पेण, जि. रायगड) याला १४ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून १९.२ तोळे वजनाचे चोरीस गेलेले सोने हस्तगत करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीला “ऑनलाइन रमी” नावाच्या जुगाराची सवय लागली होती. त्यासाठी पैसे उभारण्यासाठी त्याने चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समद बेग व त्यांच्या टीमने आरोपीला अटक करत हा तपास पूर्ण करून या घटनेचा उलगडा केला.

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading