ऐनघरच्या उपसरपंचपदी भगवान शिद यांची बिनविरोध निवड !

Ainghar Upsarpanch
सुकेळी ( दिनेश ठमके )
रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाग क्र ४ मधील वाघ्रणवाडी गावातील सदस्य भगवान तानू शिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेना(उबाठा) नेते व जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोरभाई जैन व विभाग प्रमुख संजय भोसले यांनी ऐनघर ग्रामपंचायत कार्यालयात येऊन नवनिर्वाचित उपसरपंच भगवान शिद यांचे अभिनंदन केले.
उपसरपंच निवडीच्या वेळी सरपंच कलावती कोकळे, माजी उपसरपंच किशोर नावले, ग्रामसेवक गोविंद शिद, सदस्य मनोहरभाई सुटे, प्रकाश डोबळे, विनोद निरगुडे, सविता धामणसे, वैदेही इंदुलकर, नथीबाई कोकळे, पल्लवी भोईर, सुवर्णा शिद, कल्याणी मोहिते, अर्चना भोसले, प्रजवली भोईर, जितेंद्र धामणसे, रोहिदास लाड, संतोष लाड, सचिन भोईर, राजू कोकळे, सुरेश वाघमारे, जानू वारगुडे, दामोदर शिद, यशवंत शिद, रामा शिद, ताया शिद, यशवंत हंबीर आदींसह कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान याआधीचे उपसरपंच किशोर नावले यांनी पक्षांतर्गत तडजोडीनुसार आपला कार्यकाळ पूर्ण करुन आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवार दि. ८ मे रोजी ही निवडणूक घेण्यात आली. सरपंच कलावती कोकळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी भगवान शिद यांचा एकमेव अर्ज आल्याने भगवान शिद यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया चोखपणे पार पडण्यासाठी ग्रामसेवक गोविंद शिद यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading