एस.टी.बसमध्ये चढत असणार्या महिलेच्या पर्समधील जवळपास 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पनवेल बस स्टँण्ड येथे घडली आहे.
दिपाली डेरे या त्यांच्या पती व मुलासह पनवेल बस आगार येथून महाड येथे जाण्याकरिता बसमध्ये चढत असताना अज्ञात आरोपीने गर्दीचा फायदा घेवून त्यांना पुढे चला असे बोलून त्यांच्या खांद्यावरील पर्सची चेन खोलून पर्समध्ये असलेले जवळपास 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेवून तो पसार झाला आहे.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.