
मुंबई (शांताराम गुडेकर ) :
आज राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी गणेशाची आरती केली. कारण याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्याने एस.टी. कर्मचाऱ्यांना वर्षा निवासस्थानी गणपतीच्या आरतीचा मान दिला नव्हता.
मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आणि भरघोस पगारवाढ दिली. एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि गणपती बाप्पा कडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायम ठेवण्याची प्रार्थना केली. यावेळी शिवसेना सचिव किरण पावसकर आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष उपस्थित होते.