
मुंबई:
ऐन सणासुदीच्या काळात राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपआपल्या गावी जात असतात. मात्र संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलं असून या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या आंदोलनात एकूण 15 संघटना सहभागी असल्याने जिल्ह्यातील आगारांमधून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना याच्या मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा फटका महामंडळालाही सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाप्रमाणेच आम्हाला सवलती द्या या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर उतरल्या आहेत. त्यामुळे आंदोलन किती दिवस सुरू राहणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.