पोलादपूर ( शैलेश पालकर ) : रयत शिक्षण संस्था सातारा संचालित विद्यामंदिर पोलादपूर प्रशाला आता पूर्णपणे पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानलगत पुर्णपणे स्थलांतरीत करण्यात आली असून याठिकाणी एम्पॅर्थी फाऊंडेशनच्या 1 कोटी रूपये खर्चाच्या इमारतीचे उदघाटन न करताच रयत शिक्षण संस्थेची शाळा सुरू झाल्यानंतर शाळा सभापती निवास शेठ यांनी उदघाटनासाठी थेट रयत शिक्षण संस्थेचे तहहयात अध्यक्ष खा.शरदश्चंद्र पवार यांनाच साकडे घातले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विद्यामंदिर पोलादपूरच्या एस.टी.स्थानकालगतच्या इमारतीचा महामार्गाशी संपर्क तुटल्याने श्रीकाळभैरवनाथ देवस्थानाच्या परिसरातील इमारतीमध्ये पुर्णपणे स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली. 1 जानेवारी 2019 रोजी पोलादपूर येथे येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री सुनील तटकरे यांनी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दानशूर संस्था तसेच व्यक्तींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदश्चंद्र पवार यांची चर्चा सुरू असताना केवळ तिथे होतो म्हणून रायगड जिल्ह्यातील एका शाळेसाठी मदत मिळण्याची आग्रही भूमिका घेतल्याने तातडीने पोलादपूर विद्यामंदिराला 1 कोटीचा लाभ उपलब्ध होणार असून विद्यामंदिर पोलादपूरचा शैक्षणिक विकास साध्य करता येईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
यानंतर पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर चौपदरीकरणामध्ये विद्यामंदिरच्या 13 वर्गखोल्यांची मोडतोड मोठया प्रमाणावर झाली. याचदरम्यान एम्पॅथी फाऊंडेशनचे सीईओ एम.आर.सुंदरेश्वरन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानालगतच्या रयत विद्यामंदिराच्या इमारतीमध्ये नियोजित इमारतीचे संकल्पनाचित्र कसे असावे, याबाबत निश्चिती करण्यात आली. याप्रसंगी रयतचे विभागीय निरिक्षक मोहिते, गव्हर्निंग बॉडी मेंबर निवास शेठ, मुख्याध्यापक मुख्याध्यापक केंगारे व ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्याहस्ते एम्पॅथी फाऊंडेशनचे सीईओ एम.आर.सुंदरेश्वरन यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.
भुमिपूजन होऊन तीन वर्षांमध्ये तळमजल्यावर दोन मजले असलेली सुसज्ज इमारत उभी राहिली आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या नवीन इमारतीमध्ये शैक्षणिक वर्ग सुरूदेखील झाले. संस्थेने नवीन इमारतीच्या आधारे जुन्या इमारतीमधील 13 वर्गखोल्यांची उणीव भरून काढली. दरम्यान, ज्या माजी मंत्री सुनील तटकरे यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरदश्चंद्र पवार यांच्याकडून 1 कोटी रूपये निधीचा पाठपुरावा केला; ते रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदारदेखील झाले. पण या नवीन इमारतीचे अधिकृतपणे उदघाटन करण्याकडे स्थानिक शाळा समितीचे काही काळ दूर्लक्ष झाले.
याबाबत वृत्तपत्रांमधून चर्चा झाल्यानंतर रयतच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य व पोलादपूर स्थानिक शाळा समिती सभापती निवास शेठ यांनी गेल्याच आठवडयात सातारा येथे रयतच्या मध्यवर्ती संस्थाकार्यालयामध्ये तहहयात अध्यक्ष खा.शरदश्चंद पवार यांची भेट घेऊन एम्पॅथी फाऊंडेशनच्या नवीन इमारतीच्या उदघाटनासाठी साकडे घातले. यावेळी खा.पवार यांनी कार्यबाहुल्यामुळे उपलब्धतेबाबत असमर्थता दर्शवित कोकणचे नेते खा.सुनील तटकरे यांच्याहस्तेच उदघाटन सोहळा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये इंग्रजी माध्यमाची ज्युनियर के.जी. व के.जी.शाळा, माध्यमिक शाळा तसेच विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.पवार यांच्या माध्यमातून विद्यमान खा.तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या एम्पॅथी फाऊंडेशनच्या नवीन इमारतीचे उदघाटन जून 2023 मध्ये मोठया समारंभपूर्वक करण्याची तयारी शाळा समिती सदस्य निवास शेठ आणि सहकारी लवकरच सुरू करणार आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.