‘एकनाथ शिंदेजीने बीजेपी को आगे बढाया’ : श्रीमहंत शांतिगिरी महाराज

'एकनाथ शिंदेजीने बीजेपी को आगे बढाया' : श्रीमहंत शांतिगिरी महाराज
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
हिंदू मान्यतानुसार मुख्यमंत्रीकी लाडली बहनको आर्थिकरूपसे सन्मानित करके फिरसे सत्तामें आनेवाले एकनाथ शिंदेजीने बीजेपीको आगे बढाया है. पहले बीजेपीको सत्तासे दूर रखा गया था इसिलिये एकनाथ शिंदेजीने बीजेपीके साथ राज्यमें सत्ता लायी थी, असे उदगार गुजरात राज्यातील श्री बिल्वेश्वरधाम वाडियावीरचे श्रीसंत महंत शांतिगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
‘सोहळयाला राजेशाही स्पर्श’ देण्यासाठी सिध्देश रमेश खानविलकर या तरुणाने अप्रतिम कल्पनाविष्कारातून आरके बँक्वेटस् मंगल कार्यालय व लॉन्स असे रुपांतर नव्या रुपातील राजा कोकणचा गार्डन रेस्टॉरंटसोबत साकारले आहे. या मंगलकार्यालयाचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी संत महंत शांतिगिरीजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना दक्षिण रायगड प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील सहसचिव नितीन दळवी, विशेष कार्यकारी अधिकारी अलगुडे, स्विय सहायक भोसले, डॉ.श्रीकांत तोडकर, शशिकांत शिंदे, महाडचे नायब तहसिलदार पाटील, पोलादपूर सहायक गटविकास अधिकारी हंबीर, विस्तार अधिकारी अनिल शिंदे, ग्रामविकास अधिकारी मेघना भोसले, पार्लेचे सरपंच शिंदे, लोहारे सरपंच दिपक पवार, तुर्भे सरपंच संभाजी जाधव, ग्रामविकास अधिकारी संघाचे पोलादपूर अध्यक्ष अनिल पवार, कॉन्ट्रॅक्टर वसंत जाधव आदींसह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. सकाळी ब्रह्मवृंदाकडून गणेश पूजन, वास्तू पूजन, होमहवन करण्यात आल्यानंतर सायंकाळी उदघाटनाचा सोहळा पार पडला.
यावेळी श्रीसंत महंत शांतिगिरीजी महाराज यांनी, रमेश खानविलकर परिवार असे शिष्य आहेत ज्यांनी असंख्य स्नेही आणि शिष्यांची निर्मिती आपल्या वर्तनातून केल्यानेच प्रयागराज येथील महाकुंभमेळयातून आपण शिष्याच्याया मंगल कार्यालयाला धन्यवाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार असून विमानाने पुन्हा कुंभमेळयात उपस्थित राहण्यास जाणार आहोत, अशी माहिती देत राजाराम कॉलेजच्या माध्यमातून शिष्य रमेश खानविलकरांनी असंख्य विद्यार्थी या देशासाठी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून घडविले आहेत. भविष्यात देशाचे पंतप्रधानदेखील त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पातून घडू शकतील, असा आशीर्वाद दिला.
यावेळी शिवसेना दक्षिण रायगड प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी, रमेश खानविलकरांच्या विविध शाळा कॉलेजबाबत माहिती होती तसेच त्यांचे समाजकार्यदेखील सर्वपरिचित आहे. हॉटेल व्यवसायाचा त्यांचा अनुभव आहे याची कल्पना नव्हती मात्र, यापुढे  त्यांचे सुपुत्र रिध्देश खानविलकर हे या व्यवसायाला उभारी आणून पर्यटकांना तसेच विविध विवाह व सभा समारंभांना या राजा कोकणचा हॉटेलमार्फत अप्रतिम सेवा देतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सामाजिक व माहितीचा अधिकाराचे कार्यकर्ते रमेश खानविलकर यांनी, मुंबई गोवा महामार्गावरील अनेक व्यवसाय उद्योग धंदे चौपदरीकरणानंतर भरभराटीला आले अन्यथा लयास गेले आहेत. चौपदरीकरणावेळी उड्डाण पूल बांधण्यात आल्यानंतर तसेच कोरोना लॉकडाऊननंतर महामार्गालगतचे कोकणचा राजा गार्डन रेस्टॉरंट राजेशाही हॉटेल हे सर्व्हिस रोड लगत खालच्या रस्त्यावर राहिल्याने या व्यवसायाची रयाच गेली होती. मात्र, आता नव्या रुपातील राजा कोकणचा गार्डन रेस्टॉरंटचे उदघाटन झाल्यानंतर जनतेला अधिकाधिक सुविधा देणारे मंगल कार्यालय, डेस्टनेशन वेडींगच्या जमान्यातील आदर्श ठिकाण ठरण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती दिली.
राज्याचे रोहयो, फलोत्पादन व खारलँड मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते शानदार सोहळयात आरके बँक्वेटस् मंगल कार्यालय व लॉन्सचे उदघाटन होणार असताना रात्री उशिरापर्यंतच्या कार्यक्रमांमुळे ना.गोगावले यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. या उदघाटन समारंभाला उपस्थित शेकडो मान्यवरांना शाल, श्रीफळ, फेटा परिधान करून श्रीसंत महंत शांतिगिरीजी महाराज यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनादेखील सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading