एकनाथदादा ठाकुर मित्र मंडळ वांगणी यांचे कार्य कौतुकास्पद – आ. धैर्यशीलदादा पाटील

dharyashil-patil
सुकेळी ( दिनेश ठमके ) : श्री. एकनाथदादा ठाकुर मित्र मंडळ वांगणी यांचे कार्य हे अगदी नेहमीच कौतुकास्पद असते. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासोबतच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखिल या मंडळाचे मोळाचे सहकार्य असल्याचे माजी आ. धैर्यशीलदादा पाटील वांगणी येथिल जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
श्री. एकनाथदादा ठाकुर मित्र मंडळ वांगणी यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन शनि.(दि.६) रोजी माजी आ. धैर्यशीलदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या कार्यक्रमाला माजी रा.जि.प.सदस्य किशोरभाई जैन, रायगड भाजपा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे, युवा नेते प्रसाद भोईर, भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान भाऊ जांबेकर, पंचायत समिती सदस्य संजय भोसले, भाजपा नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, भाजपा सरचिटणीस रोहा तालुका आनंद लाड, यशवंत हळदे, गौतम जैन, लहु तेलंगे, रमेश भिसे, एकनाथ दळवी, निखिल मढवी, विशाल म्हात्रे, प्रविण ताडकर, शंकर ठाकुर,ह.भ.प. दळवी गुरुजी, कांचन ठाकुर, संतोष जैन, सुनिल नावळे, पंकज जांबेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या नृत्य स्पर्धेत ग्रुप डान्समध्ये ओमसाई अकॅडमी पाली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मुद्रा अकॅडमी शिहु व एच . बी. ग्रील अकॅडमी मुरुड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर हर्षाली ग्रुप अलिबाग व बल्लाळेश्वर ग्रुप पाली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे वैयक्तिक डान्समध्ये रोशनी कदम (महाड) हिने प्रथम क्रमांक मिळविला.ऋतिका शिंदे (पाली) व वंशिता नाईक (पाली) यांना द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर दिशा भोपी (अलिबाग) व उत्तम शिद (नागोठणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या बक्षिस वितरण समारंभाला कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एकनाथदादा ठाकुर, लहु तेलंगे, भाऊ तेलंगे, सुरेश तेलंगे , सखाराम ठाकुर, परशुराम ठाकुर, रुपेश दळवी, प्रकाश ठाकुर, बाळा भिसे, ज्ञानेश्वर पवार, खंडु तेलंगे, भरत यादव, प्रविण कदम, सौरभ तेलंगे, शुभम तेलंगे, मनिष तेलंगे, रोशन चव्हाण, नरेश चव्हाण, प्रतिक तेलंगे, हेमंत तेलंगे , मंगेश मांडे, हेमंत चव्हाण आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading