कर्जत तालुक्यातील खांडपे येथील असलेल्या हॉटेल रेडिसन ब्यूल्यू येथील दोन स्वयंपाकी म्हणून काम करणारे विवेक सिंग रावत व रुपेन सुब्बा कामगार हे सोमवार दि. ७ एप्रिल २०२५ रोजी हॉटेल मधील त्यांचा सुट्टीचा दिवस असल्याने हॉटेल रेडिसन ब्यूल्यू मागून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पोहण्यासाठी उल्हास नदी पात्रात हे दोघे उतरले असता, ते दोघे हे उल्हास नदी पात्रात बुडाले असल्याची घटना घडली होती.
मात्र ते बेपत्ता असल्याची घटने बाबतची माहिती ही कर्जत पोलीस ठाण्याला दि. ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजण्याचे सुमारास समजताचा कर्जत पोलीसांनी खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांच्या रेस्कयू टीमला प्राचारण करण्यात आले असता, एकाचा मृतदेह हा नदी पात्रात एका ठिकाणी पाण्यावर तरंगत असल्याचा सापडला तर दुसऱ्याचा शोध घेतला असता मृतदेह हा नदीपात्रात पाण्याखाली सापडून आला आहे.
या दोन मृत इसमान पैकी एक उतराखंड राज्यातील तर एक दार्जिलिंग मधील राहाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर मृतदेह हे सर्व शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असुन, पुढील तपास हा कर्जत पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.