
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
उलवे नोड सेक्टर ६ येथे सिडकोने उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रकल्प फक्त 10% कार्यरत असून, पूर्णपणे बंद असलेल्या प्रक्रियेने उलवे खाडी प्रदूषित केली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना दुर्गंधी आणि डासांची समस्या निर्माण झाली आहे, तसेच काही नागरिकांना डेंगू व मलेरिया सारखे रोग झाले आहेत.
मनसेने या समस्येवर सातत्याने लक्ष ठेवून सिडको प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला. मनसेच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिडकोला नोटीस दिली आहे आणि सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. आता सिडकोने कंत्राटदारावर काय कारवाई केली जाते आणि प्रकल्पातील त्रुटी सुधारल्या जातात का, हे उलवे नोड वासीयांचे लक्ष लागले आहे.