आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि आणि महिला मंडळ यांच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सेक्टर १७ उलवे नोड येथे मोठया जल्लोष मध्ये साजरी करण्यात आली.
शिवजयंतीचे यंदाचे हे ८ वे वर्ष आहे.आम्ही उलवे कर मित्र मंडळचे संस्थापक सचिन राजे येरुणकर हे नेहमीच सामाजिक आणि संस्कृतीक उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करत असतात आणि उलवे मध्ये त्यांच्या मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यामध्ये जेष्ठ नागरिक यांचा सत्कार, लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, वेषभूषा, मर्दाणी खेळ आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळच्या भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन असे विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात आले.या उत्तम कार्यक्रमांची चर्चा संपूर्ण उलवे मध्ये झाली. उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे नागरिकांनी, शिवप्रेमीनी विविध उपक्रमांचे कौतुक करत या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.