यशश्री शिंदे हत्याकांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून सदरची घटना उरण मोरा येथील फड न.5 मोहन स्टोर,सिंडीकेट बँकेच्या जवळील डोंगरावर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात घडली आहे.
या कामी मुलीच्या आईने मोर सागरी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली असून फिर्यादीत तिने म्हटले आहे.माझे पती,दोन मुलगे अनुक्रमे 10 व 9 वर्षाची दोन मुले 3 वर्षाची मुलगी व सासरेअसा परिवार एकत्रितपणे राहतो 13 जानेवारीस मी मुलीला शेजारच्या आंगणवाडीत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोडली व दुपारी 1 वाजता तिला घरी आणली असल्याचे तिने आपल्या फिर्यादी मध्ये नोदविले आहे.
त्यानंतर आई घरातील आई कपडे धुण्याघरात गेली परंतु मुलगी अंगणात खेळण्यासाठी जाण्या करिता रडू लागलीती बाहेर जाऊ नये म्हणून दाराला प्लॅउड लाऊन अडकून ठेवले मुलगी जोरजोरात का रडते त्यामुळे त्यांचा शेजारी राहणारा दिनेश नितेकर(50)हा तेथे आला व मुलगी रडण्याचे कारण त्यांनी विचारले व मुलीला त्यांनी खेळण्या साठी अंगणात सोडले की वेळातआई काम आटोपून आली अंगणात मुलगी दिसत नाही पाहून तिने दिनेश नितेकर याल मुली संदर्भात विचारण केली असता मुलगी गल्लीत खेळत असल्याचे त्यांनी सांगितले. आईने गल्लीत शोध घेतला परंतु मुलगी दिसत नसल्याने तिने दिनेश नितेकर यास पुन्हा विचारणा केली असता मुलगी संडासाच्या दरवाज्य जवळ असल्याचे तो म्हणाला.
आई मुलीला आणण्या साठी गेली असता मुलगी घाबरून आईला बिलगून जोरजोरात रडू लागली आईने उचलून तिला घरी आणले तिला ताप भरला म्हणून उरण मधील अभिनव चाईल्ड केअर क्लिनिक मध्ये नेले असता तेथी डॉ.अजय कोळी यानी तापावरऔषध देऊन घरी जाण्यास सांगितले, परंतु तीन दिवसा नंतरही ताप उतरला नाही आणि मुलीने दिनेश काकाने शूच्या जागी हात लावल्याचे सांगितले, त्यामुळे मुलीला उरण मघील गाडे हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉ.प्रीती गाडे यांनी तिची पूर्ण तपासणी करून गुप्त अंगावर जखमा असल्याचे लेखी पत्रच दिले, त्यानंतर आईच्या पाया खालची वाळू सरकली तिने थेट मोर सागरी पोलीस ठाणे गाठून या बाबत दिनेश निवेतकर यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली.आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
त्या अनुषगाने मोरा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता2023 कलाम 62(2),बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-4 बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण आधी नियम 2012 कलम-6 प्रमाणे गुंन्हादाखल करण्यात अला आहे या संदर्भात मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.