श्रीराम जन्मोत्सव निमित्त चैत्र शुद्ध ९ रविवार दि ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम मंदिर बाझारपेठ उरण शहर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरं झाले.
सकाळी ६ वाजता काकड आरती, ७:१५ आरती, सकाळी ११ ते १ हभप सुधीर बाळ महाराज डोंबिवली यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. तबला वादक विशाल पाटेकर, हार्मोनियम भारत पाटील यांनी कीर्तनला साथ दिली. दुपारी १२:४० श्रीराम जन्म, १२:५० वाजता नहाणी, दुपारी १ वाजता पाळणा, दुपारी १:१० वा. आरती, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री गुजराती महिला सत्संग मंडळ यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ गणपती चौक उरण यांच्या भजनाच्या गजरात पालखी सोहळा आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहात साजरे झाले.
सकल हिंदू समाज तर्फे उरण शहरात भव्य दिव्य असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तांनी उरण शहरातील बाझारपेठेतील श्रीराम मंदिरात रांगेत उभे राहून शिस्तीने उभे राहून मोठया प्रमाणात दर्शन घेतले. श्रीराम मंदिरात व मंदिरा भोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होते. विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
याप्रसंगी आमदार महेश बालदी, नगरसेवक कौशिक शहा, हितेश शहा, चंद्रकांत ठक्कर, किरण ठक्कर, सदानंद गायकवाड, विनायक जोशी, कुंदप बंधू, विवेक देशमुख, राजू माळी, देविसिंग दसाणा, विक्रम ठक्कर, बंटी भाजीवाले, बबलू गुप्ता, मनु सहातीया, गणेश सेवक, संजीव अग्रवाल, रनछोड पटेल, उमाकांत ठक्कर, ईश्वरभाई ठक्कर, निलेश ठक्कर, शिवजीभाई खरबर,कश्यप मेहता, चेतन ठक्कर, विपुल पारेख, मयूर मेहता, राजू ठक्कर, मोटा सिंग, लालू पटेल, रमेश पूजारा, वसंत ठक्कर, किसनलाल डांगी, अरुण मोदी, दिनेश ठक्कर, पालूभाई भिंडे, अजित ठक्कर, कल्पेश ठक्कर, पृथ्वीराज जोशी, रमाकांत म्हात्रे, मनन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. एकंदरीत श्रीराम मंदिर बाझारपेठ उरण शहर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.