उरण तालुक्यातील शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Manohar Bhoir

उरण ( विठ्ठल ममताबादे ) :

उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील शक्करपीर येथे शिवसेना(ठाकरे) पक्षाच्या नवीन शाखेचे उद्घाटन रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व उरण चे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला.नवीन स्थापन झालेल्या शिवसेना शक्करपीर शाखेच्या शाखाप्रमुखपदी अश्फाक शेख व उपशाखाप्रमुखपदी इर्शाद मेमन यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व उरणचे माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले की इथल्या स्थानिक समस्या रस्ते, पाणी, गटारे हे सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण जास्तच जास्त शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करून सर्वांचे शिवसेना (ठाकरे) पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेवक समीर मुखरी,शहर संघटक महेश वर्तक, युवासेना शहरप्रमुख आशिष गोवारी, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, अल्पसंख्यांक सेलच्या तालुका अध्यक्षा हुसेना शेख, शाखा संघटिका हसीमा सरदार, वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष संतोष पाटील, उपशाखाप्रमुख शाहरुख गडी, फतेह खान, इक्रार शेख, गटप्रमुख उमेश भंडारी व शक्करपीर येथील कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading