उरण तालुका हा औद्योगिक दृष्टीने महत्वाचा असून मोठमोठ्या नवनवीन प्रकल्पामुळे उरण मध्ये नविन शहर निर्माण होत आहे. नविन औद्योगिकीकरणामुळे नविन वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात लोकसंख्येत भरमसाठ वाढ झालेली आहे व उरण तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे प्रदुषणामध्ये मोठी वाढ निर्माण झालेली आहे. तसेच हृदय विकाराच्या आजाराचे प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व हृदय विकाराच्या झटक्याने मयत पावणाऱ्यांच्या संख्येमध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ झालेली आहे.
उरण विभागामध्ये हृदय विकाराचा झटका आल्यावर जवळपास असे अत्याधुनिक हॉस्पीटलची उपलब्धता नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे तसेच सी.पी. आर. देण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे वैद्यकिय डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यामुळे अनेकांचे विनाकारण जीव गमावले जात आहेत. तरी नागरीकांना हॉस्पीटलमध्ये हार्ट अटॅक संबंधीत अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होण्याकरीता आय.सी.यु. युनिट स्थापन होणे आवश्यक आहे.
या संदर्भात उरण तालुक्यातील इंदिरा गांधी शासकीय रूग्णालयात आय.सी.यु. युनिट सुविधा उपलब्ध व्हावे अशी मागणी परिक्षीत प्रज्ञा प्रकाश ठाकूर- तालुका अध्यक्ष, उरण राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा पवार गट )यांनी महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली होती.परीक्षित ठाकूर यांची मागणी भविष्याच्या दृष्टीने योग्य असल्यामुळे व भविष्यात आयसीयु युनिटची नितांत गरज असल्याचे निदर्शनास येताच परीक्षित ठाकूर यांच्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री आदितीताई तटकरे यांनी यावर तात्काळ कार्यवाही केली असून मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत उरण मध्ये इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात आयसीयु युनिट स्थापन करण्याची विनंती केली आहे.
तसेच इंदिरा गांधी रुग्णालयात संबंधितांना योग्य तो निर्देश देण्यात यावेत असेही आदितीताई तटकरे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली आहे.उरणच्या विकासासाठी नेहमी कटीबद्ध असलेले खासदार सुनिल तटकरे व मंत्री आदितीताई तटकरे यांच्या मुळे हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.परीक्षित ठाकूर हे उरण मधील एक उत्तम राजकारणी आहेतच तसेच एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक देखील आहेत.त्यांनी आजपर्यंत जनतेच्या अनेक समस्यावर शासनाकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. अनेक गोर गरिबांचे प्रश्न शासनाच्या मंत्री, आमदार, खासदार पर्यंत मांडलेले आहेत. जनतेविषयी आस्था व प्रेम,आपुलकी असलेले परीक्षित ठाकूर यांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात आयसीयु युनिट स्थापन करावे अशी मागणी केली.
या मागणीला उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानी जाहीर पाठिंबा दिला आहे. सर्वच स्तरातून परीक्षित ठाकूर यांच्या या मागणीचे सर्वत्र स्वागत होत आहे. मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार सुनिल तटकरे व मंत्री आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असून याचा लाभ सर्वसामान्य गोर गरीब लोकांना मोठया प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या मागणी मुळे उरणकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.