उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेणमध्ये सभा; विकासाचे आश्वासन परंतु पेणकरांच्या अपेक्षांवर निराशा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेणमध्ये सभा; विकासाचे आश्वासन परंतु पेणकरांच्या अपेक्षांवर निराशा
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी  पेणमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवीशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.
यावेळी फडणवीस यांनी महायुती सरकारच्या गती व प्रगतीवर भर देत विविध विकास योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर रविशेठ पाटील यांना आश्वासन दिले की विधानसभा विभागात कधीही निधीची कमतरता येणार नाही.  तसेच  सिंचन, पाणीपुरवठा, रस्ते, एसटी महामंडळाचे सवलती अशा विविध प्रकल्पांबद्दल माहिती दिली.
फडणवीस म्हणाले की, मुंबई-विरार-आलिबाग कॉरिडोर, बंदरांचा विकास आणि सिंचनाच्या विविध प्रकल्पांमुळे पेण आणि आसपासच्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. तसेच त्यांनी शेतकर्‍यांसाठी पीक विमा, किसान सन्मान योजना तसेच मोफत विजेचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटीमध्ये 50% सवलत, कन्या भाग्यश्री योजना या विविध योजना सुरू केल्याचेही नमूद केले.
परंतु, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या गती व प्रगतीवर भर दिला, मात्र पेणकरांच्या स्थानिक प्रलंबित प्रश्नांवर काहीच भाष्य झाले नाही. बाळगंगा धरणग्रस्तांचा प्रश्न सोडला तर  पेण खारेपाटीचा पाण्याचा मुद्दा, अर्बन बँकेचा प्रश्न आणि गेली 17 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नांवर काहीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे पेणकरांमध्ये नाराजीचा सुर उमटला.
पेणकरांना विकासाचे आश्वासन देण्यात आले असले तरी, त्यांच्या मूलभूत समस्यांवर भाष्य न झाल्याने ही सभा अपेक्षाभंगाची ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading