म्हसळा तालुक्यात घुम गावातील सातवीमध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी उघडकीस आली. गर्वांग यांच्या मृत्युने घूम गावासाठी संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या मृत्युला माणगाव रुग्णालयातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याचा कुटुंबीयांनी केले आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस विश्वास तोडणकर व इतर कार्यकर्ते यांनी गायकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेवून झालेल्या घटनेची माहिती घेतली.
गर्वांग आजारी झाल्यामुळे त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लाऊन त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी विना उपचार करता त्याला घरी पाठवले, मात्र गर्वांग घरी पोहचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवला असता तर त्यांच्या कुटुंबियांवर अशी दु:खाची वेळ आली नसती.
गर्वांगच्या बाबतीत झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे गायकर कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. श्रीवर्धन, म्हसळा हे तालुके निसर्ग संपन्न आहेत मात्र येथील आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे दोन रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू झाला. यातून रायगड जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत आरोग्य मंत्री यांची भेट घेवून झालेल्या दोन्ही घटनेच्या बाबतीत जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून केली जाणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.