संगणक शिक्षणाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे अग्रस्थानी असलेल्या नॅशनल कम्प्युटर, पेण या संस्थेने आपल्या उत्कृष्ट कार्यातून रायगड जिल्ह्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 1995 साली स्थापना झाल्यापासून संगणक साक्षरतेच्या प्रसारासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे. रायगड जिल्ह्यातील टॉप टेन संगणक संस्थांमध्ये आपली घोडदौड कायम राखणाऱ्या या संस्थेचा फायदा यंदाच्या उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका स्मिता शेळके यांनी केले आहे.
अभ्यासक्रमांची वैविध्यता आणि सोयीस्कर बॅचेस
नॅशनल कम्प्युटरमध्ये MS-CIT सोबतच Tally Prime (GST ), AutoCAD, DTP, Advance Excel यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यार्थीच्या सोयीनुसार बॅचेस उपलब्ध करून देण्यात येतात, जेणेकरून शिक्षणासोबतच इतर जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य होते.
दुर्बल घटकांसाठी विशेष योजना
संस्था ही केवळ सामान्य प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून, दुर्बल आणि मागास घटकातील युवक-युवतींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. यामध्ये दोन महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे:
1. अमृत कलश योजना ब्राह्मण, कायस्थ, गुजराती, पटेल, राजपूत, मारवाडी, ठाकूर, वैश्य व अन्य 21 खुल्या प्रवर्गातील जातींना अंतर्भूत करत ही योजना मोफत संगणक प्रशिक्षण उपलब्ध करून देते. या योजनेचा उद्देश म्हणजे कौशल्य विकासातून युवकांना रोजगार व स्वावलंबनाची संधी देणे.
2. छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य विकास योजना मराठा आणि कुणबी समाजातील 18 ते 45 वयोगटातील युवकांसाठी चार महत्त्वाचे संगणक कोर्सेस पूर्णतः मोफत शिकवले जातात. पात्रता म्हणून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाला राष्ट्रीय मान्यता
नॅशनल कम्प्युटर ही व्होकेशनल बोर्ड मान्यताप्राप्त संस्था असून, एमकेसीएलच्या अधिकृत मान्यतेसह विविध कोर्सेससाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाते.
विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त उपक्रम
संस्था केवळ शैक्षणिक प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून, ऑनलाइन एज्युकेशन फॉर्म भरणे, करिअर गाईडन्स सेमिनार, मुलींसाठी आरोग्य शिबिरे, शैक्षणिक व वैद्यकीय कॅम्प अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
नोकरीसाठी सज्जतेचा मंच
नॅशनल कम्प्युटर ही संस्था पेण तालुक्यातील युवकांसाठी संगणक शिक्षणासोबतच नोकरीसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ ठरत आहे. या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांनी गमावू नये.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.