पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये डयुटी करीत असताना पोलीस हवालदार दिलिप सारंगे यांना अचानक वर्दीमध्ये पाहून शाहिद कपूरच्या ‘देवा’ सिनेमामध्ये छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली. शाहिद कपूरचा हा ‘देवा’ शुक्रवार दि. 31जानेवारी रोजी जगात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
रॉय कपूर फिल्मस निर्मित शाहिद कपूर व पूजा हेडगे अभिनित या ‘देवा’ सिनेमाच्या रोशन ऍड्रयज या दिग्दर्शकांनी वसई येथे चित्रीकरण करण्याकामी जाण्यास रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह सर्व वरिष्ठांनी प्रोत्साहनासह परवानगी दिल्याने पोलीस हवालदार दिलिप सारंगे यांना ही संधी साधता आली आहे.
मुंबई पोलीसांच्या कामगिरीवर आधारित या सिनेमामध्ये पोलीसांच्याच भुमिकेमध्ये मिळालेल्या छोटयाशा भूमिकेसाठी प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्याचे आवाहन दिलीप सारंगे यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.