उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांना रायगड जिल्हा परिषदेकडून मिळणार औषधे

Zp
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यात उच्च रक्तदाबाचे ३४ हजार ४७ तर २१ हजार ३९९ मधुमेह रुग्ण आहेत. या रुग्णांची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली असून, रुग्णांना ३ महिन्यांचा आवश्यक औषधांचा एन.सी.डी. कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ३४ हजार २०० आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात ५५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० उपकेंद्र, ७ जिल्हा परिषद दवाखाने, ३ प्राथमिक आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील औषधे देण्यात येतात. उपलब्धतेनुसार रुग्णांना औषधे देण्यात येत असल्याने, ही औषधे संपल्यानंतर दुर्गम भागातील काही रुग्ण सतत आरोग्य केंद्रात येऊन औषधे नेण्यास चालढकलपणा करतात. यामुळे औषधां अभावी या रुग्णांना इतर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे जिल्हा परिषद सेस नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह रुग्णांना एका वेळी तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील उच्च रक्तदाबाच्या ३४ हजार ४७ तर मधुमेहाचे २१ हजार ३९९ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचे कीट तयार करण्यात आले असून, १ एप्रिलपासून रुग्णांना या कोटाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading