उचेडे-मळेघर येथील जीवन चंद्रकांत मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन, परिसरात शोककळा

Jeevan
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
पेण तालुक्यातील उचेडे-मळेघर येथील जीवन चंद्रकांत मोरे (वय ४३) यांचे सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारच्या वेळी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे, जीवन मोरे या तरुणाचे आकस्मिक निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सर्वांसोबत हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे असणारे जीवन मोरे हे अंबिका कबड्डी क्रीडा मंडळ मळेघर चे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविले होते. आपल्या कुटुंबात ते मोठे असल्याने कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती व ते सर्व जबाबदारी निर्विवादपणे पार पाडत असत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी मळेघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवारांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व टाकादेवी – बहिरोळे शाळेतील सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, दोन काका, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहेत, तसेच तेरावे सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मळेघर येथील राहत्या घरी होणार आहेत. मामा शिवाय कोणाचाही दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading