सद्यस्थितीत माथेरानमध्ये एकूण ९४ हातरीक्षा चालकांपैकी केवळ वीस ई रिक्षा हातरीक्षा चालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 74 हात रिक्षा चालकांना सुध्दा ई रिक्षाची परवानगी मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटना मंगळवार दि. 14 जानेवारी पासून हातरिक्षा व ई रिक्षा बंद ठेवून बेमुदत उपोषण करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी सेंट झेवीयर्स शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर फिलोजेम्स यांनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के पी बक्षी यांच्याकडे केली आहे.
सेंट झेवीयर्स शाळा ही (ओलांपिया रेसकोर्स) येथे गावापासून पाच किलोमीटर दूरवर आहे. अगदी केजी पासून दहावी पर्यंत विद्यार्थी शाळेत येतात . ई रिक्षाची सेवा विद्यार्थ्यांना खूपच सोयीस्कर आहे. नियमितपणे 274 विद्यार्थी व 22 शिक्षक या सेवेचा लाभ घेतात. मात्र 15 ई रिक्षा मधून ही सेवा देण्यासाठी कमी पडतात.
ई रिक्षाची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत सिस्टर फिलोजेम्स यांनी व्यक्त केले असून श्रमिक रिक्षा संघटने सोबत चर्चा करून मार्ग काढावा अशी विनंती अध्यक्ष के पी बक्षी यांच्याकडे फिलोजेम्स
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.