महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वाद निर्माण झाला आहे. पराभूत झालेल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या यादीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे.
ईव्हीएम पडताळणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये शुल्क आकारले जात असून, पाच टक्के मतदान केंद्रांवरील मशीन तपासणी करता येते. अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत ही प्रक्रिया होऊ शकते.
ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या नेत्यांवर भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी “पराभव पचवता न आल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत,” असा आरोप केला आहे. तर, रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांच्यावर टीका करत, “ईव्हीएमवर संशय घेऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे अमित शाहांवरच संशय व्यक्त केला आहे,” असे म्हटले आहे.
दरम्यान, यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अणुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मडवी, बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे उमेदवार क्षितीज ठाकूर बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश आहे.
या पडताळणीनंतर पराभूत उमेदवारांची शंका दूर होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.