पनवेल तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्यातील येथील सुपरवायझर याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पो हवा देवरे , पो.हवा.कुदळे, पो.हवा. धुमाळ, पो.हवा. तांडेल, पो.हवा. बाबर, पो.शि. सोनकांबळे, पो.शि. खताळ, पो. शि. भगत आदींच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आारोपींचा तांत्रिक तपास तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध सुरू केला.
आरोपी मो. राशिद मो. नाझीम फारूकी (32), मो. साहीद अजगर आली (21), मो. आसिफ मो. रेहमान (24), मो. इम्रान शफीक अहमद फारुकी (43), सर्व राहणार धारावी मुंबई यांची माहिती मिळाली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या गाडी नं. एमएच 43 एटी 3919 जिची किंमत 3 लाख रुपये इतकी आहे व त्या गाडीच्या आधारे सदर ठिकाणी येवून त्यांनी इलेक्ट्रिक वायर व साहित्य पैकी 3,17,220 रुपये किमतीचा व मोबाईल फोन 20,000/-किमंतीचे असा एकूण 6,37,220/-रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या चौकडीला ताब्यात घेताच त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल व वापरलेली गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदर चौकडीने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले आहेत का? याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.