पनवेल जवळील पुष्पक नोड सेक्टर 1 येथील एका इमारतीवरुन खाली पडून जखमी होवून त्यानंतर मयत झालेल्या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
येथील निर्माणधीन इमारतीवरुन खाली पडून सदर इसम जखमी होवून मयत झाला आहे. त्याचा बांधा मध्यम, वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावर मध्यम काळे केस, उंची अंदाजे 5 फुट आहे.
या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर यांच्याशी संपर्क साधावा.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.