इनरव्हील क्लब ऑफ पेण चा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा

inneval-group-pen
PEN न्यूज ऑनलाइन टीम : इनर्व्हिल् क्लब् ऑफ पेण पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात महात्मा गांधी वाचनालय पेण येथे पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय इनर्व्हील क्लब डिस्ट्रिक्ट व्हॉइस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, विशेष अतिथी लक्ष्मी पिचिका लाभल्या.यावेळी त्या म्हणल्या की, क्लबला कुठल्याही प्रकारची मदत लागली तरी आम्ही सहकार्य करू, तसेच क्लब मेम्बर होण्याचेही आश्वसन दिले.
मावळत्या अध्यक्षा तन्वी हजारे यांनी नवनिर्वाचित इनरव्हील क्लब अध्यक्षा ज्योती अवघडे यांच्याकडे क्लबचा कार्यभार सोपविला.
इनर्व्हील टीम अध्यक्ष – ज्योती अवघडे, उपाध्यक्ष- सोनाली पाटील, सेक्रेटरी – श्वेता गावंड, खजिनदार – दक्षता जाधव, औडिटर कीर्ती सावंत, आयएससो – तेजस्विनी महाले या सर्व नवीन कमिटी मेंबर्सना शुभेच्छा दिल्या.
nca1
नवनिर्वाचीत अध्यक्षा ज्योती अवघडे म्हणाल्या की, येत्या वर्षात हरित भूमी, सर्वशिक्षा, जेष्ठ नागरिक, शैक्षणिक आनंददायी शाळा अश्या अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे.
यावेळी ज्योती अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली सरिता रणपिसे, जयश्री पाटील, स्वाती अडसूळ, दिव्या शहा, भावना पगारे, अदिती जोशी, रुची महालकर, मानसी पाटील, राजश्री म्हात्रे, प्रियांका मुखरकी, भारती पाटील या नूतन मेंबर म्हणून क्लब मध्ये जॉईंन झाल्या त्यांना भेटवस्तू व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित त्याच प्रमाणे डॉ नीता कदम, ऍड. मंगेश नेने , पटेल ज्वेलर्स, पत्रकार दीपक लोके, पत्रकार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण, रोटरी अध्यक्ष मधुबाला निकम, जयेश शहाआदी मान्यवर व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
सुत्रसंचलन संयोगीता टेमघरे यांनी केले. यावेळी सुनंदा गावंड, मुस्कान झटम, पास्ट प्रेसिडेंट तन्वी हजारे, सुषमा तेलंगे, सुप्रिया सोडकर, सोनाली पवार यांची उपस्थीती लाभली.
nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading