आ.भरतशेठ गोगावले यांच्या गैरहजेरीत ‘प्रतिगोगावले’

Pratigogavale
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
शहरासह पोलादपूर तालुक्यात शिवसेना धनुष्यबाण चिन्हाचा प्रचार सर्वत्र शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. दररोज शहराच्या तसेच तालुक्याच्या विविध भागांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रतोद आ.भरतशेठ गोगावले यांचा प्रचार करणारे महायुतीतील भारतीय जनता पक्ष व शिवसेना पक्षाचे सुमारे 100 हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. आ.गोगावले यांच्यासारखी वेशभूषा करून प्रचार करणारा सिध्देश तुकाराम विमल मोरे हा तरूण पोलादपूरकरांच्या कौतुकाचा विषय ठरला.
पोलादपूर तालुक्यातील विविध भागात ग्रामीण कार्यकर्ते प्रचारयंत्रणा राबवित असताना पोलादपूर शहरामध्येदेखील आ.गोगावले यांच्या प्रचाराची धुरा भारतीय जनता पक्ष व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी टाळया पिटून एकासुराने धनुष्यबाण तसेच आमदार गोगावले यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. गेल्या दोन सोमवारी सायंकाळपासून आ.गोगावले यांच्या गेल्या 15 वर्षातील कारकिर्दीतील विकासकामांची दृश्यं दाखविणारा एलसीडी स्क्रीन बसविलेला फिरता चित्ररथ पोलादपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये फिरण्यास सुरूवात झाली आहे.
या स्क्रीनसोबत भारतीय जनता पक्षाचे मनोज भागवत, पंकज बुटाला, समाधान शेठ, सचिन बुटाला, किशन मेस्त्री, शिवसेनेच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, माजी नगराध्यक्ष प्रकाशआण्णा गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, शहरप्रमुख सुरेश पवार, दिपक हरिभाऊ उतेकर, समीर शेठ, डॉ.संजय शेठ, महिला सभापती अस्मिता पवार, नगरसेवक प्रसाद इंगवले व शिल्पा दरेकर आदी उपस्थित होते.
पोलादपूर शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजपनेते प्रसन्ना पालांडे, अर्थ व नियोजन सभापती अंकिता निकम,शहरअध्यक्ष राजाभाऊ दिक्षित, रचना धुमाळ, कलिका अधिकारी, राजू  धुमाळ, तनुजा भागवत, सपना बुटाला, मोरे मॅडम, गणेश शेठ, अमित तलाठी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अजित खेडेकर, आरडे, तसेच शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल मेहता, नगरसेवक विनायक दिक्षित, माजी उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ, सचिन मेहता, मनोज प्रजापती, बाबा सलागरे, हर्ष धारिया तसेच अनेक शिवसैनिक महिला पुरूष कार्यकर्ते रोज संध्याकाळी मतदार जनतेच्या भेटीगाठी घेऊन आ.भरतशेठ गोगावले यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
पोलादपूर शहरामध्ये शिवाजी नगर येथील नवरात्रौत्सवामध्ये फॅन्सीड्रेस स्पर्धेमध्ये आ.गोगावले यांच्यासारखी वेशभूषा करून सिध्देश तुकाराम विमल मोरे हा तरूण वावरला होता. या तरूणाने आ.भरतशेठ गोगावले यांच्या गैरहजेरीत प्रचाररॅलीमध्ये ‘प्रतिगोगावले’ म्हणून उपस्थित राहून मतदारांना केलेले आवाहन पोलादपूरकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading