बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोड मध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे तसेच गावातील कमिटी मध्ये गावातील किमान एक दिव्यांग बांधवांचा समावेश करून घ्यावे. या प्रमुख मागणीसाठी गावातील दिव्यांग बांधव हे मंगळवार दिनांक २५/३/२०२५ रोजी बोकडविरा ग्रामपंचायत येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलनाला बसणार होते मात्र धरणे आंदोलनाला बसण्यापूर्वीच बोकडविरा ग्रामपंचायतचे सरपंच अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, ग्रामसेवक घाडगे, ,सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र म्हात्रे, यशवंत ठाकूर, महिला सामाजिक कार्यकर्त्या हेमलता पाटील, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी समीर ठाकूर, रणिता ठाकूर, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांच्यात महत्वाची बैठक ग्रामपंचायत बोकडविरा येथे संपन्न झाली.
दिव्यांग बांधवाचे प्रतिनिधी म्हणून दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र नामदेव म्हात्रे (बोकडवीरा )यांनी नेतृत्व केले.या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या महत्वाच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी दिव्यांग बांधवाना त्यांचे मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान, आनंद व्यक्त करत जाहीर केलेले आमरण उपोषण स्थगित केले. मागण्या मान्य केल्याने सर्व दिव्यांग बांधवांनी सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे जाहीर आभार मानले आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.