आरोग्य विषयक जनजागृती करत रुग्णांच्या विविध आजारावर मोफत मार्गदर्शन व औषधे

Rotary Club Uran
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
वनवासी कल्याण आश्रम उरण आणि डॉक्टर हळदीपूर कर यांचे लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आणि इंडियन फार्मासुटिकल असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय औषध निर्माण आठवड्या निमित्त आरोग्य मार्गदर्शन आणि मोफत हिमोग्लोबिन, रक्त शर्करा तपासणी , औषधे वाटप,शिबिर  जांभूळपाडा मराठी शाळा तालुका  उरण येथे आयोजित करण्यात आले होते.
 जांभूळपाडा वाडीतील , गावातील तसेच आजूबाजूच्या  गावातील १२० रुग्णांचे डोळे तपासण्यात आले.त्यामध्ये २२ जणांना मोतीबिंदू आढळले . त्यातील १६ रूणांना त्याच दिवशी पनवेल येथे लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. इंडियन फार्मासुटिकल असोसिएशनचे वतीने रुग्णांचा रक्त दाब आणि रक्त शर्करा तपासण्यात आली. ज्या रुग्णांना हिमोग्लोबिन कमी आहे त्या  सगळ्यांना  मोफत हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषधे देण्यात आली.
याप्रसंगी इंडियन फार्मसी असोसिएशन महाराष्ट्र शाखा  सेक्रेटरी  नितीन मनियार , आय पी ए महाराष्ट्र शाखाउपाध्यक्ष   सतीश शहा , विजयकुमार घाडगे , शशिकांत रासकर , उमाकांत पानसरे, विश्वनाथ पाटील,बळीराम पेणकर,लक्ष्मी इन्स्टिट्यूट चे कँप को ऑर्डीनेटर विनोद पाचघरे ,डॉ.मित पिलिमकर, डॉ.भूषण रांगरे,
वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत महिला प्रमुख सुनंदा वाघमारे, जिल्हा हितरक्ष प्रमुख श्रीमती मीरा पाटील उपस्थित होत्या.जांभूळपाडा येथील सुनील नाईक यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यात  मोलाचे सहकार्य केले.
वनवासी कल्याण आश्रम उरणचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी लक्ष्मी आय चॅरिटेबल ट्रस्ट यांचे नेत्रचिकित्सा केल्याबद्दल तसेच इंडियन फार्मासुटिकल असोसिएशनने मोफत आरोग्य मार्गदर्शन आणि हिमोग्लोबिन चेकअप ब्लड प्रेशर चेक अप आणि मोफत औषधे रुग्णांना दिल्याबद्दल आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading