आमरसमुळे पनवेल-सायन महामार्ग झाला जाम

road-amras
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल- सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या रिक्षामधील आमरसाने भरलेली अंदाजे पाच ते दहा किलो वजनाची पिशवी रस्त्यावर रस्त्यावर आमरस पसरले. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ पनवेल- सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठा ब्रिजवर पाच ते सहा वाहने घसरून पडले. हा प्रकार ऑइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, रस्त्यावर आमरस सांडल्याची बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब वाहतूक पोलिसांना कळवण्यात आली होती.
या वेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत सदर ठिकाणी माती टाकून वाहतूक सुरळीत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading