आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून मापगांव ग्रामपंचायत हद्दीत कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे

Mahendra Dalvi

सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :

अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून व ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
यातील काही विकासकामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. आमदार महेंद्र दळवी हे दिलेला शब्द पाळणारा “दमदार आमदार” म्हणून ते जनसामान्यांमध्ये ओळखले जातात. “बोले तैसा चालेत्याची वंदावी पावले” या उक्तीप्रमाणे आमदार महेंद्र हरी दळवी यांनी मापगाव ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांबद्दल दिलेले सर्व शब्द पूर्ण करुन दाखवले असल्याचे शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून मुशेत येथील मांगिणदेवी मंदिरासमोर शेड बांधणे(पाच लाख रुपये),
मुशेत -भंडारपाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे(२५ लाख),
मुशेत येथे नागेश परब ते पांडुरंग सुर्वे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता तयार करणे(२५लाख),
मुशेत नदीवर विसर्जन घाट बांधणे(१० लाख),
मुशेत जाधवपाडा येथे मंदिरासमोर सभामंडप(स्टेज) बांधणे(४ लाख),
मुशेत येथे पाणी साठवण टाकी बांधणे(१५ लाख),
मुशेत येथील समाजमंदिराजवळ व मनिष म्हात्रे यांच्या घराजवळच्या नाक्यावर प्रत्येकी एक सोलर हायमॅक्स बसविणे(१ लाख),
मापगाव येथे मारुती मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अंतर्गत काँक्रीटरस्ता करणे(२५ लाख),
मापगाव येथील गणपती मंदिर परीसर सुशोभिकरण करणे(१० लाख),
मापगाव बोकडवीरा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे(२० लाख),
मौजे बहिरोळे येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे(२५ लाख),
मौजे बेलवली येथील विनय घरत यांच्या घरापासून उध्देश भगत यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण करणे(३लाख),
मौजे चोरोंडे सेवाशक्ती पतसंस्थेपासून संजय साने यांच्या घरापर्यंत रस्ताडांबरीकरण करणे(१५ लाख),
मौजे सोगाव येथील सुरेश राऊत यांच्या घरापासून श्री. खांजोडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता तयार करणे१५ लाख),
मौजे सोगांव बौध्दवाडी येथे अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता तयार करणे(१० लाख),
मौजे सोगाव येथे कब्रस्थान सुशोभिकरण करणे(४लाख ९९ हजार नऊशे नऊ रुपये),
मौजे सोगांव येथील मुस्लिम मोहल्ला येथे अंतर्गत रस्ता तयार करणे(५ लाख),
मुनवली येथे होळीच्या माळाचे सुशोभिकरण करणे(३लाख),
मौजे मापगाव येथे मारुती मंदिराजवळ हायमॅक्स दिवा बसविणे,
मौजे बेलवली येथे पुलाजवळ सोलर हायमॅक्स दिवा बसविणे,
मौजे सोगांव स्मशानभूमी जवळ सोलर हायमॅक्स दिवा बसविणे
आदी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करून काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचे जगदीश सावंत यांनी माहिती देताना सांगितले आहे.
याबद्दल आमदार महेंद्र दळवी यांचे मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील बहिरोळे, बेलवली, मापगाव, मुशेत, चोरोंडे, सोगांव व मुनवली ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading