लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींकडून नागरिकांना फोन करून पैशांची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकारात अज्ञात व्यक्तींनी पंजाबी भाषेत संवाद साधत, आमदार ठाकूर यांच्या नावाने नागरिकांना फोन केले. संशयित व्यक्तींनी काही नागरिकांना पैसे देण्याची विनंती करताच, काहींनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी फोन कट केला.
आमदार ठाकूर यांनी सांगितले की, “३ मे रोजी मला माहिती मिळाली की, माझ्या नावाने काही जणांना फोन करून पैसे मागण्यात आले आहेत. त्यामुळे मी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. नागरिकांनी सावध राहावे आणि अशा प्रकारचे कोणतेही कॉल आल्यास लगेच कळवावे किंवा थेट पोलीस ठाण्यात तक्रार करावी.”
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सायबर तपास सुरू करण्यात आला आहे आणि लवकरच संबंधित आरोपींना गजाआड करण्याची शक्यता आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.