आमदारकी कुणाची खाजगी मालमत्ता नाही, पेण मतदार संघात परिवर्तन घडणार, शिवसेनेची मशाल पेटणार

Prasad Bhoir Karyakarta Baithak
पेण मतदार संघात बदलाची लाट, शिवसेनेचा विजय निश्चित : अनंत गीते
PEN न्यूज ऑनलाइन टीम  :
“आमदारकी कुणाची खाजगी मालमत्ता नाही, अकार्यक्षम नेतृत्वाला मतदार घरी बसवतील,” असे मत शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. पेण येथे आयोजित महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रसाद भोईर यांच्या विजयावर आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, या मतदारसंघात परिवर्तनाची लाट असून, हजारोंच्या मताधिक्याने शिवसेनेचा पहिला आमदार बनण्याचे भाग्य प्रसाद भोईर यांना लाभणार आहे.
शिवसेनेने प्रचारात घेतलेली आघाडी पाहता विरोधकांची धास्ती वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून प्रसाद भोईर गावागावात जाऊन प्रचार करत आहेत. “शिवसैनिक पेटून उठला तर त्याच्यासमोर कोणताही राजकीय पक्ष तग धरू शकत नाही,” असे गीते यांनी ठणकावून सांगितले. मतदारांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करत गीते म्हणाले की, “निवडणूक जिंकण्याचे गणित जुळले असून, शिवसेनेची मशाल पेटून प्रसाद भोईर आमदार होतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.”
प्रसाद भोईर यांनी आपल्या उमेदवारीमुळे विरोधक घाबरले असल्याचे सांगितले. “शिवसैनिकांच्या पाठिंब्याने माझा विजय निश्चित आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मतदारांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करत भोईर यांनी रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण, पाणी प्रश्न आदी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. “विकास घडवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे आणि या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पेण मतदार संघात फडकणार आहे,” असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.
  या माहाविकास आघाडीच्या आढावा बैठकीला शिवसेना नेते अनंत गीते, जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दिपश पोटफोडे, शेकापच्या स्मिता पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश पोरे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चीले, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, चंद्रकांत गायकवाड, शेकाच्या माजी सभापती दर्शना म्हात्रे, काँग्रेसचे माजी सरपंच डोलवी हरिषचंद्र पाटील, भिमशेठ पाटील, यशवंत पाटील उपतालुकाप्रमुख संतोष पाटील,  विधानसभा सहसमन्वयक समिर म्हात्रे, तालुका सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, लहू पाटील, शहर प्रमुख सुहास पाटील, जिते विभाग प्रमुख राजू पाटील, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, माजी उपजिल्हा प्रमुख अनंत पाटील, नरेश सोनवणे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, राजश्री घरत, अच्युत पाटील, दिलीप पाटील, नंदू मोकल, चेतन मोकल, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, गजानन मोकल, वसंत म्हात्रे, चंद्राहास म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading